Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना : जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाथरन डी.




जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने बजावावा मतदानाचा हक्

धुळे, दि. 20 (प्रतिनिधी ) :महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार असून धुळे जिल्ह्यातील 05- साक्री, 06- धुळे ग्रामीण, 07- धुळे शहर, 08- शिंदखेडा, 09- शिरपूर मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी पोहोचले आहेत. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, धुळे जिल्ह्यात 8 लाख 68 हजार 537 पुरुष, 8 लाख 14 हजार 706 एवढे महिला मतदार आहेत, तर अन्य 27 मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या अशी : साक्री- 3,42,640, धुळे ग्रामीण- 3,71,865, धुळे शहर- 3,21,697, शिंदखेडा- 3,26,509, शिरपूर- 3,20,559. मतदान केंद्रांचा तपशील असा : साक्री- 368, धुळे ग्रामीण- 372, धुळे शहर- 286, शिंदखेडा- 340, शिरपूर- 329.सखी मतदान केंद्र : साक्री- न्यू इंग्लिश स्कूल, साक्री, जुनी इमारत, पूर्वेकडील खोली, धुळे ग्रामीण- वणी बुद्रुक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक 2, धुळे शहर- धुळे देवपूर, उन्नती विद्यालय, देवपूर, पूर्व बाजू खोली क्रमांक 1, शिंदखेडा- दोंडाईचा, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, उत्तर- दक्षिण इमारत, खोली क्रमांक 5 (दक्षिणेकडून), शिरपूर- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय क्रमांक 9, वरवाडे, पूर्व- पश्चिम इमारत, पूर्व बाजू खोली क्रमांक 4. आदर्श मतदान केंद्र : साक्री- पिंपळनेर, के. ए. एम. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर, पूर्व बाजू, दक्षिणोत्तर जुनी इमारत, उत्तर बाजू, खोली क्रमांक 4. धुळे ग्रामीण- भोकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पूर्व बाजू, खोली क्रमांक 2, भोकर. धुळे शहर- उन्नती विद्यालय, देवपूर, धुळे, पूर्व बाजू, खोली क्रमांक 3. शिंदखेडा- निमगूळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्रमांक 1, निमगूळ. शिरपूर- मांडळ, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, मांडळ, पूर्व बाजू, खोली क्रमांक 1.दिव्यांग मतदान केंद्र : साक्री- पिंपळनेर, एस. पी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर, उत्तरेकडील बाजू, पूर्व- पश्चिम इमारत, खोली क्रमांक 2. धुळे ग्रामीण- गरुड हायस्कूल, खोली क्रमांक 1. शिंदखेडा- शिंदखेडा, उज्ज्वल प्राथमिक विद्यालय, जाधवनगर, शिंदखेडा, पूर्व- पश्चिम इमारत, खोली क्रमांक 1. शिरपूर- शंकर पांडू माळी विद्यालय, बसस्थानकाजवळ, शिरपूर, दक्षिणोत्तर इमारत, खोली क्रमांक 2.मतदान कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी व कर्मचारी (राखीव कर्मचाऱ्यांसह) : साक्री- 1988, धुळे ग्रामीण- 2012, धुळे शहर- 1546, शिंदखेडा- 1840, शिरपूर- 1777. एकूण 9163 कर्मचारी. दिव्यांग मतदारांची संख्या व पुरविण्यात आलेल्या सुविधा (अनुक्रमे मतदारसंख्या, व्हील चेअरची मागणी, पुरविलेल्या व्हीलचेअर, स्वयंसेवकांची नियुक्ती, ब्रेल लिपीतील चिन्ह या क्रमाने) – साक्री- 1437, 42, 38, 38, 257, 70. धुळे ग्रामीण- 981, 16, 05, 04, 372, 22. धुळे शहर- 814, 51, 47, 18, 227, 20. शिंदखेडा- 1486, 24, 52, 06, 338, 46. शिरपूर- 1540, 17, 17, 06, 282, 114.मतदानाच्या दिवशी 17 मतदान केंद्रांवर 17 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 203 बस, 252 जीप, 152 क्रूझर, 15 ट्रकसह अन्य 30 अशा 652 वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच 182 केंद्रावरुन वेबकॉस्टिंग करण्यात येईल. त्यात 17 क्रिटीकल, सखी, दिव्यांग व आदर्श असे प्रत्येकी पाच मतदान केंद्रांचा समावेश आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत चार पिस्तुल, दोन तलवारी जप्त

करण्यात आले आहेत. तसेच 386 परवानाधारक शस्त्र जमा केले आहेत. याशिवाय 24 लाख 87 हजार 599 रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. सी- व्हिजिल ॲपवर प्राप्त 20 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.मतदानासाठी आवश्यक ओळखपत्राचे पुरावे असे : पारपत्र, वाहन चालक परवाना, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक, पोस्ट विभागाने छायाचित्रासह वितरण केलेले पासबुक, पॅनकार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, मा. खासदार, मा. आमदार यांचे अधिकृतओळखपत्र, आधारकार्ड.मतदानासाठी 1842 पोलिस कॉन्स्टेबल, 669 गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय पोलिस दलाच्या पाच तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मतमोजणीचे ठिकाण असे :साक्री- शासकीय धान्य गोदाम, शेवाळी फाटा, साक्री, ता. साक्री, जि. धुळे. धुळे ग्रामीण- शासकीय धान्य गोदाम क्रमांक दोन, पश्चिम बाजू, केंद्रीय विद्यालयाजवळ, नगावबारी, देवपूर, धुळे. धुळे शहर- शासकीय धान्य गोदाम क्रमांक दोन, पूर्व बाजू, केंद्रीय विद्यालयाजवळ, नगावबारी, देवपूर, धुळे. शिंदखेडा- शासकीय धान्य गोदाम क्रमांक 2, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ, शिंदखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे. शिरपूर- मुकेशभाई पटेल टाऊन हॉलजवळ, करवंदनाका, शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे.धुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात मतदार जागृती रॅली, एक पत्र मतदारासाठी, पालक सभा- मेळावा, पथनाट्य, एकांकिका, व्होटर लिटरसी क्लब आदींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध