Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

बिकानेरचा कलंक पुसूया भूमीपुत्र अनिल पाटील यांना विजयी करू - जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील




प्रतिनिधी :अमळनेर विधानसभा मतदारसंघावर गेल्या पाच वर्षांपूर्वी लागलेला कलंक पुसून यंदा स्थानिक भूमीपुत्राला साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी शुक्रवारी रत्नापिंप्री येथील जाहीर सभेत केले.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रि.पा.ई(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षांचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत त्या शुक्रवारी रात्री झालेल्या सभेत बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प्रा अशोक पवार, रंजना देशमुख, रिता बाविस्कर, एकलव्य आदिवासी सेनेचे प्रदेशाध्यक्ष राज साळवी, एकलव्य सेनेचे तालुकाध्यक्ष हिरालाल महाराज भिल मुंबई येथील पत्रकार सुधीर सूर्यवंशी, सतीश भिल आदींनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी बोलतांना सांगितले की 
निवडणुकीत अनिल भाईदास पाटील अठरापगड जातीचा भूमिपुत्र म्हणून सर्वसामान्य जनतेचा सामान्य प्रतिनिधी निवडणुकीत उभे आहेत. गेल्या पाच वर्षे आपण बिकानेरचा कलंक घेऊन फिरत होतो. संपूर्ण राज्यात आपण या नावाने ओळखले जात होतो. पाच वर्षात वाढलेली गुंडगिरी, अवैध धंदे धोक्यात आलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे अमळनेर शहर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करत आहे याला आळा घालण्यासाठी आपण यंदा स्थानिक भूमीपुत्राला विजयी करण्याचा निर्धार करावा असे आवाहन या सभेत जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी केले आहे.

यावेळी प्रा अशोक पवार, रंजना देशमुख रिता बाविस्कर, सुधीर सूर्यवंशी सतीश भिल यांनीही आपल्या मनोगतातुन आमदार काय असतो त्याने जनतेसाठी काय करायचं असते याविषयी आपले मत मांडले या सभेसाठी हिम्मत पाटील, बाळू पाटील, मुक्तार खाटीक, राहुल गोत्राळ, सुनील शिंपी, ज्ञानेश्वर देसले, प्रशांत भदाणे, भूषण भदाणे, गणेश पितांबर पाटील, शुभम बोरसे, अनिरुद्ध सिसोदे, उमेश सोनार, इम्रान खाटीक, अबीद शेख, रोमन पिंजारी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, मुन्ना पवार, रत्नापिंप्री येथील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध