Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

सच्चा आमदार म्हणून काशिराम पावरा यापुढेही काम करतील, त्यांना निवडून द्या -माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे बोराडी येथील सभेत आवाहन




 
शिरपूर:प्रतिनिधी :भाजपा मध्ये प्रवेश हा फक्त आपल्या सर्वांच्या तालुक्याच्या विकासासाठीच केला. सच्चा आमदार म्हणून काशिराम पावरा यापुढेही काम करतील. आदिवासी बांधव यांच्यासह सर्व समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणार. अनेक पिढया नाव काढतील असा तालुका येत्या पाच वर्षात विकसीत करणार. सर्वच क्षेत्रात गेल्या 35 वर्षात विकास केला आहे. सर्वांनी एकत्र राहून कामे करु या. 

महाराष्ट्रात पुन्हा भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार येणार असून सत्तेचा वापर तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाच्या दूरदृष्टीतून न भूतो न भविष्यती प्रगती होत आहे. यासाठी काशिराम पावरा यांना भरघोस मतांनी विजयी करुन तालुक्यातील कारखाना व सर्व प्रकल्प सुरळीत चालण्यासाठी तसेच जनतेच्या सेवेची संधी द्यावी असे नम्र आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले.

बोराडी कर्मवीर व्यंकटराव अण्णा यांच्या कर्मभूमी मध्ये दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर शुक्रवारी दि. 18 ऑक्टोबर रोजी परिसरातील 50 ते 60 गावांच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची विजय संकल्प सभा घेण्यात आली.

यावेळी काशिराम पावरा म्हणाले, एकदा सत्तेत व दुसऱ्यांदा विरोधात आमदार म्हणून काम केले. सत्ता नसल्याने गेल्या पाच वर्षात विकासकामांमध्ये कमतरता राहिली. मोदीजी केंद्रात व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरात विकासकामे केली, प्रभावित होऊन आम्ही भाजपा मध्ये आलो, कोणीही शंका घेवू नका. अमरिशभाई यांच्या नेतृत्वाखाली खूप कामे झाली. काही निर्णय भाई व सर्वांच्या सल्ल्याने घ्यावे लागतात. भ्रष्टाचारा पासून लांब राहिलो. निस्वार्थपणे काम करतो. विधानसभे मध्ये अनेक प्रश्न मांडले आहेत. त्याच्याशिवाय कामे झाली का. सरकार मध्ये राहिल्यावर आता भाई व आम्ही प्रयत्न करू. 

कारखान्यासाठी पंतप्रधान मोदीजी व मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कडे पाठपुरावा करणार आहोत. यापुढे मी रात्रंदिवस काम करेल. कोणीही भूलथापांना बळी पडू नका. मी भूमिपुत्र आहे. सर्व तालुका सुखी झाला तर मी सुखी होईल या पद्धतीने मी वागतो.
गुजराथ आमदार नरेश पटेल म्हणाले, बूथ मजबूत करा, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार निश्चित बनेल. आदिवासी भागात व सर्व तालुक्यात भाई आपले ईश्वरीय कार्य आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले, भाई व दादांचे कार्य अफाट आहे. भाई 30 वर्षांपूर्वी भाजप मध्येच होते. भाई यांनी शैक्षणिक क्षेत्रातील वैभवशाली माणूस आहे. स्वच्छ चारित्र्याचे दादांना निवडून द्या. समोरच्या डॉक्टरचे हॉस्पिटलचे अनेक कारनामे प्रचंड बोगस असून मुख्यमंत्री सहायता निधीत मोठ्या प्रमाणात लुटले आहे.

तुषार रंधे म्हणाले, भाई आपल्या पाठीशी आम्ही व बोराडी परिसर नेहमी राहणार. आपण एकत्र तालुक्याच्या विकासात सोबत राहणार.

भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे म्हणाले, विरोधकांच्या शिट्टीचा आवाज गुल केल्याशिवाय राहणार नाही. भाई आपल्या पाठीशी कायम राहणार. जनता पाठीशी आहे व राहिल. विरोधकांच्या नादी कोणीही लागू नका. बोराडी येथे अनेक विकास कामे केली. बोराडी ला विकासासाठी भाई यांनी यापुढे सहकार्य करावे.

वसंत पावरा  म्हणाले, आपल्या सज्जन दादांना सर्वांनी विजयी करायचे आहे.
व्यासपीठावर अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, गुजराथ आमदार नरेश पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, कि.वि.प्र.संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, रमेश वसावे, वसंत पावरा, सरपंच सुरेखा पावरा, मोहन महाजन, निशांत रंधे, रोहित रंधे, सत्तारसिंग पावरा, माधवराव पाटील, नामदेव चौधरी, जयवंत पाडवी, साहेबराव पाटील, गुलाबराव मालचे, शशांक रंधे, सखाराम पावरा, परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, महिला पुरुष, मतदार मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंदराव पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध