Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

मारवड येथील काँग्रेसचे भिकन भालेराव पाटील व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश...



अमळनेर:प्रतिनिधी : येथील संस्थाचालक व काँग्रेस चे नेते भिकन भालेराव पाटील यांच्या सह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा ताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नगरसेवक मनोज पाटील, महिला आघाडीच्या योजना पाटील यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भिकन पाटील यांच्या सह त्यांच्या सौभाग्यवती विजयाबाई भिकनराव पाटील, प्रमोद दत्तात्रय शिंदे (धानोरे), लोटण साहेबराव पाटील (डांगरीकर) यांनी प्रवेश घेतला.  भिकन पाटील यांनी काँग्रेस कडून पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. तसेच मारवड येथील त्यांच्या संस्थेमुळे परिसरात त्यांचा मोठ्या प्रमाणावर संपर्क आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार अनिल पाटील यांचे हाथ बळकट होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध