Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

शेतकरी कर्जमाफीवरून जखम टोंगळ्याला -पट्टी मस्तकाला : राज्यमंत्री बच्चू कडू



BY पंकज पाटील

2020-02-29  

  • पाथर्डीची घटना दुर्दैवी
  • शेतकर्यांनी आत्महत्या करू नका माझ्याशी संपर्क करा : बच्चू कडू




शेतकरी कर्जमाफी करून प्रश्न सुटणार नाही .सरकारने कर्जमाफी केली चांगल्या प्रकारे ती राबविली गेली याबद्दल दुमत नाही . पण कर्जमाफी करून प्रश्न सुटणार नाहीत.आजही शेतकरी कर्जबाजारी आहे उद्याही राहणार आहे. त्यामुळे कर्जमाफी पेक्षा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना बँक कर्ज देण्यास  टाळाटाळ करत असतील किंवा कमी कर्ज देत असतील तर माझ्याशी संपर्क करा किंवा संदेश द्या .NPA झालेल्या शेतकर्यांना कमी कर्ज माफी देणाऱ्या टाळाटाळ करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याच्या मोबाईल नंबर द्या आम्ही त्यांच्या कानशिलात देवू . पण कुणीही आत्महत्या करू नये  असे आव्हान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध