Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

नविन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना चोरट्यांनी दिली मोठी सलामी



धुळे:प्रतिनिधी:धुळे तालुक्यातील शिरुड गावात पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेचे खालील गाळ्या मध्ये असलेले एटीएम मशीन पिकप व्हाॅन 
च्या सहाय्याने होडुन लंपास केले या एटीएम मध्ये १)१४,०७,५००/-रूपये रोख त्यात ५०० रूपये दराच्या २७६७ च्या नोटा व २०००/-रूपये दराच्या १२ नोटा
२)५०,०००/- रूकि.चे सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखेच्या डी. बोल्ड कंपनीचे
आय,डी. क्रमांक M03C/1666/11 सन २०१४ चे मॉडेल असलेले एटीएम. मशिन असा १४,५७,५००/-रूपये एकुण रोकड असल्याची माहिती कळते. तरी नक्की किती रक्कम एटीएम मध्ये होती, हे कळले नाही. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाल्या नंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात अस्तांना त्यांना चार चोरटे दिसुन झाले असून त्याचे खालील प्रमाणे वर्णन आहे


१)एक अनोळखी इसम त्याचे अंगावर तपकिरी रंगाचे त्यावर काळे पटटे।
असलेले ब्लॅकेट ओढलेले दिसत असुन, अंगात शर्ट व पॅट परिधान केलेला
दिसत असुन आहे,

२)अनओळखी इसम त्याचे अंगावर काळा रंगाचा जॅकेट, आत मध्ये निळया
रंगाचे टी शर्ट व गळया मध्ये निळया रंगाचे मफलर व डोक्यावर लाल हिरव्या
कलरची टोपी घातलेला दिसत असुन त्याचे पायात काळया रंगाचे स्पोर्ट शुज
त्यास पांढ-या रंगाची तळवे असलेले दिसत आहे.

३) अनोळखी इसम त्याचे अंगात फिक्कट तपकिरी रंगाचे जर्किंग व फिक्कट
निळसर रंगाची जिन्सची पॅन्ट घोतलेला व पायात पांढ-या व राखाडी रंगाचे
स्पोर्ट शुज घातलेला दिसत आहे.

४)चौथा अनोळखी इसम त्याचे अंगात शर्ट पॅन्ट घातलेला व पायात शुज घातलेला दिसत आहे.

वरील ४ हि इसम हे २५ ते ३५ असून


पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना चोरट्यांनी मोठी सलामी दिली आहे

या अगोदरही शिरुड गावातून दिनांक 25/10/2019 रोजी धनतेरसच्या दिवशी 
सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला होता परंतु शिरुड गावातील ग्रामस्थांच्या सर्तकतेने हि घटना टळली होती या घटनेचा
अद्यापही तपास लागलेला नाही. त्यानंतर आता परत ही दूसरी घटना घडली असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

एटीएमसाठी वापरलेली गाडी धुळ्यातील दरोडेखोरांनी एटीएम पळविण्याआधी धुळ्यात आपला कारनामा दाखविला चोरट्यानी धुळ्यातील अग्रवालनगर लगत राहणाऱ्या स्थायी समितीचे माजी सभापती युवराज पाटील यांच्या बगल्यापासून जवळ असलेल्या एका व्यापाऱ्याची पीकअप व्हॅन लपास केली याच व्हॅनचा वापर चोरट्यानी एटीएम पळविण्यासाठी केल्याचे पोलिसाच्या प्राथमिक तपासात उघड झाल्याचे कळते.

तालुका पोलिसांनी मदतीसाठी फिंगरप्रिंट तज्ञ, श्वानपथक यांची मदत घेतली परंतु श्वान हा गावातील वेशीजवळ घुटमळत राहिला. चोरीबाबत तालुका पोलीस ठाणे मध्ये उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध