Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

संपूर्ण खान्देश डिजिटल करण्याचा संकल्प-प्रवीण महाजन


जैतपिर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संगणक कक्ष स्थापन-
अमळनेर प्रतिनिधी -शिवाजी महाजन 
शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत असलेल्या खान्देश भागात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देण्यासाठी युवकमित्र परिवार कटिबद्ध असून संपूर्ण खान्देश डिजिटल करण्याचा मानस असल्याचे पुणे येथील संगणक साक्षरता अभियानाचे कार्यकर्त प्रवीण महाजन यांनी मत व्यक्त केले.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त के.पी.सोनार माध्यमिक विद्यालय जैतपिर ता.अमळनेर येथे रोटरी क्लब पुणे मार्फत मोफत पाच संगणक कक्ष उदघाटनप्रसंगी प्रवीण महाजन बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती दर्शना पवार ह्या होत्या तर उदघाटक म्हणून भिलालीचे उपसरपंच अमोल माळी,देवगाव देवळी येथील पत्रकार शिवाजी महाजन,किशोर महाजन,शाळेचे संचालक पवन देविदास माळी यांच्यासह जैतपिरचे सरपंच निलेश बागुल,काशीनाथ धनगर,समाधान चिंचोरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दर्शना पवार यांनी विद्यार्थ्याना चांगला नागरिक म्हणून जीवन जगण्याचा सल्ला दिला.अमोल माळी यांनी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यानीं प्रचंड अभ्यास करण्याचा मंत्र दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मुकेश अहिरे यांनी केले.

सूत्रसंचालन शिक्षिका पी.आर.पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक आर पी मासुळे,डी व्ही पावरा, पी एम चौधरी,यु एन पाटील,श्रीमती  सी.ए.मोरे,सी.आर.जाधव यांचे सहकार्य लाभले.आभार जे.आर.जगताप यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध