Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १ मार्च, २०२०

ढिवर समाजाची घरकुल व विविध समस्येवर सभा सम्पन्न



18 मार्च ला शेकडो लोकांचे सामूहिक घरकुल प्रस्ताव समाज कल्याण आयुक्त देणार

भंडारा:प्रतिनिधी:आरक्षण,घरकुल योजना,मासेमारी संबंधित समस्या व प्रश्न आणि इतर शासकीय योजना व समस्यावर चर्चा करण्या संदर्भात विश्राम गृह भंडारा येथे एकलव्य ढिवर-भोई सेनेचे संस्थापक के.एन.नान्हे यांचे अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सह.संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे,सामाजिक कार्यकर्ते जनार्दन खेडकर, टी. बी. मारबते, पार्टीचे गोडबोले सर ,बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय सहारे, भटक्या-विमुक्त जाती-जमाती कृती समितीचे सुरेश खंगार, संदीप मारबते, आरक्षण संवादचे मनोज केवट, राजकुमार मोहनकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मोहनकर, सभा घेण्यात आली.

या सभेत भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकानां मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने  विविध योजना सुरु केल्या आहेत परन्तु त्या योजना अजूनही समाजापर्यंत  पोहचलेल्या नाही. अशीच एक महत्वपूर्ण योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.ही योजना रमाई घरकुल योजनेच्या धरतीवर आहे. या योजनेची माहिती प्रशासनाने प्रसिद्धी केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने आपल्याकडून प्रस्ताव मागितले नाही, त्याचप्रमाणे समाजातील आरक्षणाचे खुप मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत, मासेमारी संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, निवडणूकीमध्ये अजूनही ढिवर समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही, कोणताही राजकीय पक्ष ढिवर समाजाची दखल घेत नाही. ढिवर समाजाची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती झाली नसल्याने ढिवर समाजाची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली नाही. 

अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सह. संघाचे व अध्यक्ष प्रकाश पचारे यांनी मत्स्यव्यवसाय संस्थेच्या तलाव ठेका धोरण विषयी अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले.जनार्दन खेडकर यांनी ढिवर समाजाच्या आरक्षणाविषयी सखोल मार्गदर्शन केले.टी.बी.मारबते यांनी समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन प्रगती करावी.कार्यक्रमाचे अध्यक्ष के.एन. नान्हे यांनी समाजानी एकत्र येऊन समाज संघटन मजबुत करणे आवश्यक आहे.एकेकाळी भंडारा जिल्हा,महाराष्ट्रात दबदबा निर्माण करणाऱ्या एकलव्य ढिवर-भोई सेना पुनर्जीवित करणे आवश्यक आहे.
 कार्यक्रमाचे संचालन सुरेश खंगार तर आभार मनोज केवट यांनी मानले, तसेच राजेश मेश्राम, किशोर शेंडे, शाहीर शेंडे, श्यामराव चाचेरे, यांच्यासह या सभेला जिल्हातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध