Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ३१ मे, २०२०
शिवसेनेकडून आर्सेनिक अल्बम-30 होमियोपॅथिक गोळ्याचे वाटप...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.31 शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तथा पर्यटनमंत्री अदीत्य ठाकरे यांनी अवाहन केल्याप्रमाणे अर्सेनिक अल्बम- 30 या होमियोपॅथिक गोळ्याचा डोस देण्यासाठी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा शिवसेना पक्षाकडुन सूरुवात करण्यात आली आहे. संपर्कप्रमुख तथा आ. प्रा. तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या धोरणानुसार 80 टक्के समाजकारणाचे संस्कार पक्षामध्ये रुजविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन अशा संकटाच्या काळामध्ये नागरीकांच्या बरोबर शिवसेना पक्ष ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या संयमी व योग्य निर्णयक्षमतेचा अनुभव सध्या राज्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्यात अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्याचे वितरण पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
याचा लाभ सर्वसामान्याबरोबरच जेष्ट नागरीक आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अधिक होणार आहे. कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी सर्व नागरीकांना हा डोस दिला जाणार आहे. तर कोरोनाच्या संदर्भात जे लोक थेट फिल्डवर काम करत आहेत, त्यांनाही हा डोस शिवसेना पक्षाच्यावतीने देण्यात येणार आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत असुन यामध्ये ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना याचा अधिक धोका असल्याचे दिसुन आले आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम -30 या गोळीची शिफारस केलेली आहे. अनेक राज्यामध्ये याचा चांगला परिणाम देखील पाहयला मिळाला आहे. कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सोडुन सगळ्यांचा या गोळ्या दिल्या जाऊ शकतात. याऔषधाचे कोणतेही दुष्पारिणाम नाहीत, या गोळ्या लहान मुलापासुन ते वृध्द, गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती घेऊ शकतात.
शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाख लोकांना सहा लाख 75 गोळ्या वितरीत केले जाणार आहेत. कोरोना सहाय्यता कक्षामध्ये कर्तव्यावर असलेले कर्मचारी, शिक्षक, या शिवाय पोलीस, होमगार्ड, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवकासह जे जे कोरोनाच्या लढाईत फिल्डवर काम करत आहेत अशा सगळ्यांना या गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. सध्या अनेक गावामध्ये रुग्ण आढळलेले आहेत, अशा सर्वच गावामधील नागरीकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत.
आज शिराढोण (ता. कळंब) येथे गोळ्या वाटुन या उपक्रमाला सूरुवात करण्यात आली आहे यावेळी धाराशिव लोकसभा सदस्य खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-उस्मानाबाद चे आ. कैलास घाडगे-पाटील, जि.प.सदस्य बालाजी (बप्पा) जाधवर, पं. स. सदस्य राजेश्वर पाटील, उपविभागीय अधिकारी सौ अहिल्या गाठाळ मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, तलाठी कलढोणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव आदी उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा