Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३१ मे, २०२०

क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत अशी बतावणी करून एका सेवानिवृत्त इसमास हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली




इंदिरानगर वार्ताहर :क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत अशी बतावणी करून एका सेवानिवृत्त इसमास हातचलाखीने  सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी. अनंत जगन्नाथ कुढे  वय ६० रा कानिफनाथ चौक राजीवनगर  दि 31 रविवारी  रोजी  हे दुपारी 1 वाजेच्या सुमारास  त्यांचे मित्राला  भेटायला पायी गेले आसता साईप्रसाद अपार्टमेंट राजीव नगर येथे  काळया रंगाच्या दुचाकीवरून दोन ईसम आले आम्ही क्राइम ब्रांच पोलिस आहोत अशी खोटी बतावणी केली तसेच
 आम्ही तपासासाठी आलो आहोत .. तुम्ही येथे कुठे फिरत आहेत . .  तुमच्या जवळचे दागिने काढा व ते रुमाल मध्ये ठेवा 
त्याप्रमाणे त्यांच्याकडील असलेले  सोन्याची चैन  अंगठी व  मोबाईल  , व ७१६ रु रोख असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल  रुमाल मध्ये ठेवण्यास सांगुण  हातचलाखीने लंपास करून दुचाकीने

राणेनगर च्या दिशेने धूम स्टाईल फरार झाले याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध