Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ मे, २०२१

कोरोना काळात रिक्षा चालवून तरुणी ठरत आहे कुटुंबाचा आधार!!



शिरपूर (प्रतिनिधी) घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची शिवाय कोरोना महामारी काळात संपूर्ण कुटुंबच उदरनिर्वाह मुळे बेचैन झालेले कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत आई वडील असतानाच शिरपूरातील एका तरुणीने वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन रोजगारासाठी थेट रिक्षा चालवून कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी उचलली आहे अल्पवयीन असताना ही वयाच्या अठराव्या वर्षी रिक्षा चालवून या तरुणीने तरुणांना व बेरोजगारांना लाजिरवाणी केले आहे.

कोरोना काळात रिक्षा चालवून एक तरुणी  कुटुंबाचा आधार ठरत आहे कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला तर अनेकांना रोजगार ही मिळाला या काळात फक्त जीवन जगणे एवढेच कार्य सुरू असताना मॅप शिरपूर शहरातील एक तरुणी आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चक्क रिक्षा चालवून वडिलांच्या व कुटुंबाच्या आर्थिक भार उचलत असल्याने या रिक्षाचालक तरुणीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरची तरुणी  उच्चशिक्षित असून ही तिने चक्क कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवून तरुणांना व बेरोजगारांना लाजिरवाणी केले आहे तिच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

धकाधकीच्या आजच्या कोरोना काळात उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील शिरपुर शहरात एकमेव रिक्षा चालक म्हणून एक उच्चशिक्षित कु हर्षदा विनोद मेटकर (शिंपी) आपले कार्य करतांना दिसते आहे. महिला रिक्षा चालक हा तर परिसरात कुतुहलाचा विषयच झाला आहे. एका गरिब शिंपी समाजातील हर्षदा विनोद मेटकर ही भगिनी कोरोनाच्या या काळात ही आपल्या कुटुंबाला व परिसरातील पिडीत समाज घटकाला मदत व्हावी म्हणून स्वत:आई वडीलाच्या खांद्याला खांदा लाऊन आपले सामाजिक सेवेचे योगदान देत आहे ह्या तिच्या कार्याचे सर्वञ अभिनंदन होतांना दिसत आहे तर काही वेळा हा कुतुहलाचा विषय सुध्दा होतांना दिसतो आहे.

परिसरातील अनेक ठिकाणी त्यांच्या रिक्षा सह त्यांच्या बरोबर सेल्फी तसेच व्हिडिओ घेण्याचा काहींना मोह होतांना दिसतो आहे आणि ते घेत आहेत. शिरपुर शहरातील एक भगिनी आणि कोरोनाच्या काळात ही ती आपले कार्य करतांना दिसत असतांना काही त्यांना पाहत असतांना त्यांच्या सेवेच्या प्रति आदरच व्यक्त करतांना दिसत आहेत.आमचे शिरपुरचे वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना त्यांनी सांगितले की, काम कोणतेही असो त्याच्याशी समरस झाले की, त्याचे महत्त्व कळते आणि त्याचा फायदा हा सर्वांना होतो असेही त्या म्हणाल्या. आमच्या तरुण गर्जना परिवारा कडून रिक्षा चालक भगिनीचे खुप खुप अभिनंदन व कौतुक करतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध