Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ मे, २०२१

नाशिक युथ क्लब" हा ग्रुप गोर गरिब बांधवांच्या मदतीसाठी कोरोनाच्या अशा संघर्षमयी काळात उतरला रस्त्यावरती




शाळेत असतांना रोज सकाळी आपण एक प्रतिज्ञा म्हणायचो "भारताची प्रतिज्ञा" तेव्हा कदाचित या प्रतिज्ञे मधल्या ओळी किंवा त्यांचे अर्थ खोलवर समजत नसावे...पण मोठ्यापणी जेव्हा ते खऱ्या अर्थाने समजायला लागतात तेव्हा नेमकी प्रतिज्ञा म्हणणं बंद होऊन जातं..त्यातली पहिली ओळ होती की,"भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहे."याच प्रतिज्ञेचा समोर ठेवून आणि आपल्या कर्तव्याच निर्वाहन करण्यासाठी "नाशिक युथ क्लब" हा ग्रुप गोर गरिब बांधवांच्या मदतीसाठी कोरोनाच्या अशा संघर्षमयी काळात रस्त्यावर उतरला आहे.


वेगवेगळ्या क्षेत्रातील आम्ही युथ मेंबर्सनी एकत्र येऊन जिथे कमी तिथे आम्ही ह्या संकल्पनेला मनाशी बाळगून गेल्या 2 महिन्यापासून गरजूंना ऑक्सिजन बेड, घरगुती ऑक्सिजन सेटअप, व्हेंटिलेटर, रक्त आणि प्लाझ्मा,औषधे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत शेकडो गरजूंना कामात येऊ शकलो ह्याचा खूप आनंद आहे.

त्याचेच एक पाऊल पुढे म्हणून गरीब, मोलमजुरी करणारे,स्थलांतरित कामगार, हॉस्पिटल बाहेर असणारे पेशंटचे नातेवाईक,भाजीपाला तत्सम विक्रेते किंवा कोणीही उपाशी मनुष्य ह्यांच्या किमान एकवेळच्या जेवणाची काळजी घेण्याच्या प्रयत्न करत आहोत. साधारण 200 पेक्षा जास्त लोकांना रोज भाजीपोळी किंवा मसाले भाताचे फूड पॅकेट, सोबत बिस्कीट पुडा आणि पाणी बॉटल असे वाटप करतो. त्यासोबत मास्क,ग्लोव्हज,ग्लुकोज व इलेक्ट्रॉल पावडर देखील वाटत आहोत.

ह्या मोहिमेला अधिक सक्षम बनावे म्हणून आपण देखील हातभार लावू शकतात. खालीलपैकी कोणत्याही प्रकारे -:
1) किराणा (साखर, तेल,शेंगदाणे, साबण इ.) 2)धान्य (गहू, तांदूळ, दाळी, कडधान्ये, पीठ इ.) 3)बिस्किट्स (पारले, ब्रिटानिया, रू.5/- चे पुडे) 4)पाणी बॉटल्स (अर्धा/एक लिटर 12 बॉटल बॉक्स) 5)मेडिकल सामग्री (ग्लोव्हज, मास्क, औषधे इ.) 6)वाटप करण्यासाठी Volunteer म्हणून 7)वरील वस्तू व्यतिरिक्त कोणाला दुसरी काही मदत करायची असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता
आपण सांगाल तिथे येऊन आम्ही सर्व मदत स्वीकारू. आपली मदत ही योग्य आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहचेल ह्याची आम्ही खात्री देतो.

प्रशासन आणि पोलिसांच्या योग्य त्या परवानगी घेऊनच आम्ही हे महत्त्वाचे कार्य करत आहोत.

#जिथे कमी तिथे आम्ही, #Nashik Youth Club, #Food 4 Hungry, #कोणीही उपाशी राहू नये

कोणाच्या जीवनाचा प्रश्न नाही सोडवू शकत निदान एकवेळ जेवणाचा प्रश्न तर नक्कीच सोडवू शकतो.

ऋषिकेश पाटील-7447766003
रविराज लभडे-7758922333
सुमित रायते-9503712112


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध