Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केंद्र शासनाने शिरपूर शहराला 3 स्टार मानांकन,राजधानी दिल्ली येथे सन्मान..!




शिरपूर प्रतिनिधी:स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे व प्रभावी अंमलबजावणी मुळे केंद्र शासनाने शिरपूर शहराला 3 स्टार मानांकन देऊन दिल्ली येथे सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.सदर बहुमान केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे सेक्रेटरी दुर्गाशंकर मिश्रा व जॉईंट सेक्रेटरी रूपा मिश्रा यांच्या हस्ते मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांना देऊन गौरविण्यात आले.

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शहर कचरामुक्त करण्याकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘स्टार रेटिंग’ची संकल्पना जाहीर केली.त्यानुसार ‘3 स्टार’, रेटिंगसाठी शिरपूर शहराची केंद्र सरकारच्या त्रयस्थ समितीकडून तपासणी करण्यात आली.त्या अन्वये केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या वतीने शिरपूर शहराला तीन तारांकित मानांकन घोषित केले आहे.

सदरचा पुरस्कार वितरण सोहळा दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाला.स्टार रेटिंग’ च्या विविध निकष मुळे हा बहुमान प्राप्त झाला आहे.घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे,निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे विलगीकरण करणे,सार्वजनिक, व्यावसायिक आणि निवासी भागांतील दैनंदिन स्वच्छता करणे,मैलापाणी वाहिन्या, नाले स्वच्छता करणे,शहरात उपलब्ध कचरापेट्यांची संख्या आणि त्यांची स्वच्छता,मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांकडून नियमांचे पालन करुन घेणे,अस्वच्छतेबाबत दंड,शुल्क आकारणी आणि प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी,नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि अभिप्राय प्रणाली, शहरातील गटारांची आणि नैसर्गिक जलसाठ्यांची स्वच्छता,कालानुरूप कचरा निर्मितीच्या प्रमाणात घट व शहर सौंदर्यीकरण साठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात.माजी शालेय,शिक्षण व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी 1985 पासून सर्वांना हेवा वाटावा असे शिरपूर शहर बनविण्याचा नेहमीच यशस्वी प्रयत्न केला असून शहरवासीयांनी देखील वेळोवेळी त्यांना साथ दिली आहे.स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी आपल्या पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.

“स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर” कायमस्वरूपी राहण्यासाठी स्वच्छतेचा वसा कायमस्वरूपी जपण्यासाठी वेळोवेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल,उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक,नगरसेविका,अधिकारी,कर्मचारी सर्वांनी प्रयत्न केले.तसेच सातत्याने व नियमितपणे नगरपरिषदेचे कामकाज आदर्शवत सुरु ठेवले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेची यशस्वी घेडदौड सुरु आहे.

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात आतापर्यंतच्या सर्वात मोठया मोहीमेत दरवर्षी शिरपूर नगर परिषदेने उल्लेखनीय काम केले आहे.शिरपूर शहराला 3 स्टार मानांकन जाहीर झाल्याने लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल,उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,सर्व नगरसेवक,सर्व नगरसेविका,मुख्याधिकारी तुषार नेरकर,प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी,नगर अभियंता माधवराव पाटील,नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे,आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके,सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध