Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील महादेव दोंदवाडा येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.त्या जखमीव्यक्तीला धुळे येथे हलवण्यात आले आहे.याप्रकरणी उपजिल्हा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सायंकाळच्या गोळीबारामूळे शिरपूर तालुका हादरला ; एक जण गंभीर

किसन जामसिंग पावरा हा या गोळीबारात जखमी झाला आहे.किसन पावरा हा सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास शिवारात बकऱ्या चारत असतांना मागून अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला त्यात किसन पावरा याच्या डाव्या मांडीला गोळी लागली.त्यास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमी गंभीर असल्याने डॉ.कदम यांनी तपासणी व औषधोपचार करून धुळे येथे 8 वाजेच्या सुमारास रेफर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध