Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

वरवाडे सावता मंदिराच्या प्रागंणात तुलसी विवाह उत्साहात संपन्न..!

  
                                                    शिरपुर : वरवाडे येथे दि.१५ रोजी  संत सावता माळी व विठ्ठल रखुमाई मंदिरात खोपडी एकादशी,प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी,श्री.भगवान तुलसी विवाहनिमित्त शि.व.न.पा.
नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी भाजपा आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष महारू माळी यांच्या हस्ते स.७ वा.महाअभिषेक करण्यात आला तसेच संध्या.तुलसी विवाह नगरसेविका सौ.चंद्रकला माळी,संतोष माळी यांच्या हस्ते भटजीव्दारा सर्व भक्तगणासमोर तुलसी विवाह आनंदात वाजत,गाचत संपन्न झाला सर्व भक्तगणांनी धार्मिक,भक्तीमय वातावरणात रात्री ९:१० वा.संत सावता माळी भजनी मंडळाने अभंग,भावगीत,
गवळणांचा भजनांचा आनंद घेतला 

या सर्व कार्यक्रमात शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिंगबर माळी,
शि.व.न.पा. माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,शि.व.न.पा.नगरसेवक दिपक महादु माळी,संत सावता माळी समाज मंदिर ट्रस्ट सचिव अधिकार माळी,सा.कार्यकर्ता भालेराव माळी,समता परिषद नितीन माळी,
विजय बागुलसर,बापु मास्तर,वारकरी सेवा मंडळ जगदीश माळी,मोहन माळी,हिलाल माळी,पुंडलीक माळी, हिरामण माळी, महादु माळी,मनोज माळी, हरिपाठ महिला मंडळ ह.भ.प.लक्ष्मण महाराज,बापु माळीसर,सोमलाल माळी,प्रभु माळी,मगन माळी,उमेश पाटील,गोपाल माळी,संजय बोरसे,वसंत माळी,बारकू माळी,जयदेव माळी,बेलदार महाराज सर्व भक्तगणांचे सहकार्य मिळाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध