Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

मुरमुऱ्याच्‍या पोत्‍यात गुटखा; स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातर्फे कारवाईत करत लाखोचा गुटखा जप्त..!



धुळे प्रतिनिधी:अवैधरित्‍या गुटखा वाहतुक व विक्री सुरू आहे. चोरून वाहतुक होत असताना पोलिसांकडून काही कारवाई केली जाते. अशात आता चक्‍क मुरमुऱ्याच्‍या पोत्यातून गुटख्याची तस्करी होत असल्‍याचे लक्षात आले आहे.याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातर्फे कारवाईत करत लाखोचा गुटखा जप्त करीत दोघांना ताब्यात घेतले आहे.

एलसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज धडक कारवाई करण्यात आली.यावेळी मुरमुऱ्याच्या पोत्याआडून विमल गुटख्याची तस्करी होत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी वाहनासह माल जप्त केला आहे.शिवाय दोघांना ताब्यात घेवून पुढील चौकशी सुरू केली आहे.

पीकअप वाहनातून गुटखा तस्करी होत असल्याची खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळे ते साक्री दरम्यान शोध मोहिम राबविली.यावेळी म्हसदीहून नेरकडे येणाऱ्या पिकअप (एम.एच.18, बीजी, 4611) या वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाने मुरमुऱ्याचे पोते घेवून जात असल्याचे सांगितले. मात्र खबर पक्की असल्याने पोलिसांनी वाहन तपासणी केली असता त्यात मुरमुऱ्याच्या पोत्याआड विमल गुटख्याची पाऊच असलेले पोते वाहतूक होत असल्याचे आढळून आले.एलसीबी पथकाने वाहनासह माल धुळे येथील कार्यालयात आणला या कारवाईत जवळपास 8 लाख 77 हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच याप्रकरणी वाहनातील दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध