Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई…! द्वारकाधिश ढाबाजवळ अवैधरित्या बायोडिझेल विक्री केल्या प्रकरणी मुद्देमालासह एकास अटक ,
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई…! द्वारकाधिश ढाबाजवळ अवैधरित्या बायोडिझेल विक्री केल्या प्रकरणी मुद्देमालासह एकास अटक ,
चोपडा प्रतिनिधी :-देवेंद्र मुरलीधर नेतकर वय ५४ धंदा नोकरी ( प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी तहसील कार्यालय चोपडा ) यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय चोपडा येथे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांचा भ्रमणध्वनी आला असता त्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित बायोडिझेलची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली असल्याचे सांगितले व त्यांच्या भ्रमणध्वनी नुसार मी लागलीच ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेतली व पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, स. फौ. देविदास शंकर इशी,पो. हे. कॉ. संजय निंबा येदे, पो. हे. कॉ. राजू श्रावण महाजन, पो. हे. कॉ. लीलाधर धनु भोई , पो.हे.कॉ भरत रामजी नाईक, पो. हे. कॉ. शिवाजी ढबू बाविस्कर ,चालक पो. हे. कॉ. विनोद राघो पाटील, पो. कॉ सुनील प्रभाकर कोळी व सोबत दोन पंच रोहिदास भालेराव कोळी व नरेंद्र ज्ञानेश्वर मोरे रा. हातेड खुर्द यांना सोबत घेऊन शिरपूर रोडवरील न्यू व्दारकाधिश ढाबाच्या बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये अवैधरित्या प्रतिबंधित केलेल्या बायोडिझेलचा बेकायदेशीर साठा करून विनापरवाना वाहनांमध्ये डिझेल विस्पोट द्रव्य किंवा बायोडिझेल विक्री करीत असलेल्या ठिकाणी झाडाझडती घेतली असता सदर ठिकाणी ४,९२००० रुपये किमतीच्या मुद्देमालासह डिझेल भरलेल्या टाक्या व डिझेल भरण्यासाठी लागणारा मशीन पंप,नळ्या इत्यादी आढळून आल्याने सदर बाबी साठवणूक केल्याप्रकरणी जाधव रामजी सिंधव रा.पंपनगर लासुर तालुका चोपडा यास अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या सर्व वस्तूंचा पंचा समक्ष सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल मधून एकूण चार काचेच्या बाटल्या ७५० एम एल मापाच्या काचेच्या बाटलीत बायोडिझेल सदृश्य विक्री होत असलेल्या इंधनाचे रासायनिक विश्लेषणासाठी नमुन्यासाठी काढून सीलबंद करून त्यावर फिर्यादी तसेच पोलिस निरीक्षक व पंचाचे सह्या घेऊन सीलबंद केले असून तसेच मिळून आलेल्या मुद्देमालासह तसेच पोलिसांच्या व पंचाच्या समक्ष सीलबंद असल्याचे करण्यात आले आहे.दि.१७ नोव्हेंबर रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपूर रोड वरील न्यु व्दारकाधिश ढाबाच्या उजव्या बाजूला पत्री शेडमध्ये जाधव रामजी शिंधव वय ३६ रा. पंपनगर लासुर तालुका चोपडा याने सुमारे ४५ हजार लिटर बायोडिझेलचा साठा करून शासनाने पडताळणी न केलेल्या मशिनच्या साह्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याचे बायोडिझेल द्रव्याच्या साठा एका पाच हजार लिटर मापाच्या प्लास्टिक टाकी व इतर साहित्य असे एकूण ४९२००० रुपये किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीर विनापरवाना स्वतःचे कब्जात व स्वतःच्या फायद्यासाठी बाळगून विक्री करताना मिळून आला व बायोडिझेल वाहनात विक्री करण्याचे शासनाचे मनाई हुकुम जारी केले असताना,विक्री करण्याच्या उद्देशाने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून देवेंद्र नेतकर ( प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी तहसील कार्यालय चोपडा) यांच्या फिर्यादीवरून जाधव रामजी सींधव वय ३६ रा. पंपनगर लासुर तालुका चोपडा यांच्या विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम २८५,१८८ सह जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५चे कलम ३ व ७ सह विस्फोटक अधिनियम द्रव्य अधिनियम १८८४ चे कलम ९(ब),१(ब),सह कलम मुंबई वजन व मापे अमलबजावणी अधिनियम १९९८ चे कलम २५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे.पुढील तपास उपविभागीय अधिकारी कृषीकेश रावले यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास कुनगर हे करीत आहेत.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा