Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

बेटावद (ता. शिंदखेडा) फ.मु.ललवाणी विद्यालय व डॉ. एस.टी. गुजर ज्युनियर कॉलेज, बेटावदचे 2005 च्या बॅचचे विद्यार्थ्यांचे स्तुत्य उपक्रम: फ.मु.ललवाणी माध्यमिक विद्यालय आणि डॉ. एस.टी. गुजर ज्युनियर कॉलेज, बेटावद येथील इ.१२ वी बॅच २००५ चे स्नेहमेळाव्याचे आयोजन दिनांक १ जून २०२५ रोजी उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. या स्नेहमेळाव्यानंतर विद्यार्थ्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत “विद्यार्थी उन्नती मंच” या नावाने एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे.या मंचाच्या वतीने विद्यालयात शिकणाऱ्या आई किंवा वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी (शुक्रवार) स्कूल बॅग, वह्या, कंपास, पाण्याची बाटली व अन्य आवश्यक शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमादरम्यान संस्थेचे माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालक यांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थी उन्नती मंच या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने सहकार्य केले जाणार असल्याची माहिती यावेळी मंचाचे प्रतिनिधी यांनी दिली.हा उपक्रम इतर बॅचच्या विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल व शिक्षणाच्या वाटचालीत गरजू विद्यार्थ्यांना नवी उमेद मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध