Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

भाजप राष्टीय कार्याध्यक्ष जे.पी नड्डा यांचा उपस्थितीत धुळ्यात दि.२४ रोजी मेळावा






जिल्हातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी 




शिरपुर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथे उत्तर महाराष्ट्र विभागाच्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, धुळे ग्रा जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष तथा म्हाडा उपसभापती बबनराव चौधरी यांनी केले आहे.

मंगळवार, दि.२४ सप्टेंबर २०१९ रोजी टोल नाका जवळील हॉटेल टॉप लाईन धुळे येथे पक्ष कार्यकर्ता विजय संकल्प मेळावा सकाळी १० वाजता होणार आहे. भारतीय जनता पार्टी राष्टीय कार्यध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड झाल्यानंतर प्रथमच धुळ्यात येत आहेत.

मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकास, अन्न औषध प्रशासन व राज शिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे आदी उपस्थित राहणार आहेत.

धुळे जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा पदाधिकारी,  प्रदेश पदाधिकारी, सदस्य, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रदेश पदाधिकारी, सदस्य, जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस,  आघाड्यांचे मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, विस्तारक, जि.प, सदस्य, पं. स. सभापती, उपसभापती, सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख अपेक्षित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष तथा म्हाडा उपसभापती बबनराव चौधरी यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध