Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दि. 18 ऑक्टोबर रोजी शिरपूर शहरात पित्रेश्वर कॉलनी मैदानावर व बोराडी येथे भव्य जाहीर सभा



शिरपूर:प्रतिनिधी : शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर पी आय. व मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे यांची व अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दि. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता बोराडी येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर तसेच रात्री 7 वाजता शिरपूर शहरात पित्रेश्वर कॉलनी मैदानावर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.




या भव्य जाहीर सभेसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर. पी. आय. व मित्रपक्षाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, सरपंच, सदस्य, नागरिक, मतदार बंधू भगिनी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भुपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेनेचे  राजू टेलर, जिल्हा उप प्रमुख हिम्मतराव महाजन, तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, तालुका संघटक छोटूसिंग राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, आर पी आय चे रमेश सैंदाणे, पदाधिकारी, मित्रपक्षाचे पदाधिकारी यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध