Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

डॉ ठाकूरांवरील अन्याय आदिवासी समाज सहन करणार नाही :- कन्हैलाल पावरा









शिरपूर:-डॉ जितेंद्र ठाकूरांवरील अन्याय तालुक्यातील आदिवासी कधीच सहन करणार नाहीत.रात्रीत पक्ष प्रवेश करणाऱ्यांंना हि जनता न्याय देईल. जनाशिर्वाद सभेत कन्हैलाल पावरा बोलत होते.शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे मोठ्या संख्येच्या उपस्थित दि १७ रोजी प्रचार रँली व सभा संपन्न झाली.

शिरपूर तालुक्यातील अपक्ष उमेदवार डॉ जितेंद्र ठाकूर यांची जनाशिर्वाद प्रचार रँली व सभेचे आयोजन करण्यात आली होती.या प्रचार रँलीत आदीवासी भागातील  मोठ्या संख्येने महिला,पुरुष व तरूण उपस्थित होते.कन्हैलाल पावरा हे बोलतांना म्हणाले की,डॉ जितेंद्र ठाकूर यांच्यावर झालेला अन्याय तालुक्यातील आदिवासी कधी सहन करणार नाहीत.रात्रीत पक्ष प्रवेश करणाऱ्यांंना हि जनता न्याय देईल.राजकारणासाठी आदीवासी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम आजतोवर करण्यात आले आहे.यानंतर डॉ जितेंद्र ठाकूर बोलतांंना म्हणाले,मनगटीत दम नसल्याने तालुक्यात जातीपातीचे घाणरडे राजकारण सुरु आहे. मात्र तालुक्याच्या स्वाभिमानासाठी अपक्ष लढा देत आहे.सांगवी गावात ट्राँमा सेंटर दहा वर्षापासून मंजूर होते.मात्र आमदारांनी दुर्लक्ष केल्याने महामार्गावरील हजारो अपघाती रूग्णांना आजतोवर जिव गमवावा लागला.



आदिवासी भागात सलईपाडा येथील फुटलेले धरण देखील आमदारांनी आजपर्यंत रोखलेले नाही. जर या धरणाकडे आमदारांनी लक्ष दिले असते तर आदीवासी बांधवांना पाण्यापासून वंचित रहावे लागले नसते.वनजमिनीचा मोठा गंभिर प्रश्न येथे होता.पळासनेर बँकेच्या दुर्लक्षितेमुळे या भागातील जनतेला बँकेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.आदिवासी भागात नोकरी गरजेची नाही.बारीपाडा सारखा विकास शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात करायचा आहे.या भागात नदीजोड प्रकल्पातून भिषण पाणीटंचाई मुक्त करण्याची गरज आहे.यावेळी बहुसंख्येने आदिवासी महिला व पुरुष सभेसाठी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध