Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

ग्रामीण रुग्णालय रावेर येथे 31 विना टाका लेप्रोस्कोपीक camp जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न




प्रतिनिधी अजीज शेख रावेर: प्रा.आ.केंद्र एनपूर येथील 13,लोहारा येथील 9,वाघोड 4,निम्भोरा -3,थोरगव्हाण -2 असे 31 पेशंट यांचा कुटुंब नियोजन शस्रक्रिया चा मेगा camp सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला.यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण सर यांनी स्वतः शस्रक्रिया केल्यात.त्याच्या सोबत डॉ.शांताराम ठाकूर , वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिवराय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद ठाकूर, डॉ.विजया झोपे ,डॉ.अनुपम अजनसोंडे, डॉ.हेमंत शर्मा , आरोग्य सहाय्यक रामभाऊ चौधरी , मुख्य अधिपरिचरिका सौ कल्पना नगरे,  सहाय्यीका के.जी.बरडे तसेच सर्व प्रा.आ.केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी  व ग्रामीण रुग्णालय स्टाफ  यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध