Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

महावितरण कंपनी मुळे शेतकऱ्यांवर आत्महतेची वेळ


महा वितरण  कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तीन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विज पुरवठा खंडीत   

BY ऑनलाईन तरुण गर्जना
१७ ऑक्टोबर २०१९
पंकज पाटील (उपसंपादक)


महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी एरंडोल येथे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले होते . त्या सभेत त्यांनी उल्लेख केला होता .आमचे सरकार शेतकऱ्यासाठी असून आम्ही आपणास शेती पंपाला मुबलक लाईट देवू .त्याच बरोबर ट्रान्सफार्मर (डीपी) जळाल्यावर चोवीस तासात बसवून शेतकऱ्यांचे कष्ट व त्रास कमी करू.आज ते स्वप्न हवेतच विरत असल्याचे चिन्ह संपुर्ण महाराष्ट्रात आहे.
दहिवद येथील युवराज पाटील यांच्या शेतातला ४२३४२१९ क्रमांकाचा ट्रान्सफार्मर तीन महिन्या पासून जळालेला आहे. वेळोवेळी गावांतील शेतकरी यांनी त्या विभागातील महावितरण अधिकारी यांच्या कडे लेखी व तोंडी तक्रारार केली होती व आहे .ट्रान्सफार्मर मुदतीत दुरुस्त करून  देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीने काम दिलेल्या इन्फ्रा कंपनीची होती .  तब्बल तीन महिने उलटून देखिल आजतागायत ट्रान्सफार्मर बदलवून देण्यात आलेला नाही .
त्या ट्रान्सफार्मरवर अवलंबुन असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कांद्याचे बियाणे जळून गेले ,कपाशीचे पिक देखिल हातातून निसटले आहे तर भाजीपाला पिकाचे स्वप्न भंगले   . तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस पडलेला असल्याने विहिरींना पाणी असून देखिल शेतकरी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे पिकाला पाणी देवू शकले  नाही . डोळ्यासमोर ताट वाढलेले असतांना पोटात घास घालता येत नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे. याला जबाबदार कोण ? एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याचा कसा जीव जातो याचे हे एक उत्तम उदाहारण आहे. शासनाचे या महा वितरण कंपनीवर  नियंत्रण असतांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शासन गंभीर का नाही ? जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष तर केले जात नाही ना ? या सर्व विषयांचा निरंतर अभ्यास होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे .याला जबाबदार असणारी महा वितरण कंपनी ने ट्रान्सफार्मर  बसविण्याचे काम इन्फ्रा कंपनीला दिलेले आहे या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत   शेतकरी न्यायालयाकडे दाद मागणार असून त्यांच्या मदतीला प्रहार संघटना उभी राहिली असून नुकसान भरपाई साठी संबधित सर्व यंत्रणा व अधिकारी ,कर्मचारी यांना न्यायालया समोर उभ करणार  असल्याचे वृत्त  तरुण गर्जनाच्या टीमच्या हाती  आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध