Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

शिंदखेडा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराने घड्याळाचा गजर



शिंदखेडा तालुक्यात मतदारसंघात संदीप बेडसे हे राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी करत आहेत त्यांच्या विरोधात पर्यटनमंत्री जयकुमार रावल उमेदवार आहेत शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शानाभाऊ सोनवणे यांनी देखील प्रचाराला जोर 


शिंदखेडा (प्रतिनिधी) शिंदखेडा मतदारसंघात सुरुवातीला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुका एक करण्याचा फंडा वापरला असून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या झंझावाती प्रचाराने संपूर्ण तालुक्यात घड्याळ्याच्या गजर सुरू झालेला आहे 

वाढवल्याने या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आह सुरुवातीला प्रचार थंडावत स्थित असताना संदीप बेडसे यांच्या प्रचाराची  धुरा काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर मा आमदार रामकृष्ण पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील दोंडाईचा येथील प्रसिद्ध वकील  एडवोकेट एकनाथ भावसार माजी सभापती किशोर पाटील शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष दीपक दिसले कृउबास संचालक तथा सारवे येथील माजी सरपंच शरद पाटील माजी सभापती दिलीप पाटील विठ्ठल सिंग गिरासे ज्येष्ठ नेते आधार मारू पाटील आबासाहेब एनसी पाटील कृउबास संचालक डॉक्टर प्रशांत बागुल धमाने उपसरपंच आबा मुंडे पाटील निमगुळ चे चंद्रकांत शिरसाट खलाणे चे माझी चे माजी सरपंच सुरेश अहिरराव अमळथे सरपंच वीरेंद्र पवार आधी प्रमुख मंडळी सांभाळत आहेत शिंदखेडा मतदारसंघात गावोगावी प्रचारसभा कोपरा मीटिंग यांच्यासह भेटी गाठींवर भर देण्यात आला असून अवघा तालुका राष्ट्रवादीमय करण्यात ते यशस्वी झाले आहेत  
शिंदखेडा मतदारसंघात सुरू असलेले दडपशाहीचे राजकारण व त्यातून होणारे कार्यकर्त्यांवरील गुन्हे यामुळे सर्वसामान्य जनता कंटाळली असून त्याचा उद्रेक निश्चितच या निवडणुकीत उमटणार असल्याची शक्यता आहे दरम्यान तालुका मतदारसंघात सुमारे शंभरावर गाड्यांचा ताफा घेऊन मोटार रॅली काढण्याचा संकल्प संदीप बेडसे यांनी पूर्ण केल्याने व त्या भरघोस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह स्वयंस्फूर्तीने मोटारी घेऊन सहभागी होऊन प्रतिसाद मिळाल्याने संदीप बेडसे यांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत दोंडाईचा येथे प्रचार कार्यालय होऊ न देणे धांदरणे येथील संदीप बेडसे यांचे राष्ट्रवादीचे प्रचाराचे बॅनर फाडणे साळवे येथील चेतन पाटील यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा यांच्यास तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांवर पक्ष प्रवेश करण्यासाठी झालेली दडपशाही ही यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आता लक्षात आलेले आहे त्यामुळे यंदा या निवडणुकीत बदल घडणारच अशा मानसिक पर्यंत तालुक्यातील मतदार पोहोचला असल्याचे सांगितले जात आहे याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांना मिळण्याची शक्यता आहे   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध