Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

भूमीपुत्राच्या विजयासाठी शिंदखेडातले भूमिपूत्र एकवटले



 
जि प चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वरआबा  भामरे


शिंदखेडा मतदारसंघात मतदारसंघाच्या बाहेर राहनाऱ्या लोकांना आघाडी कडून उमेदवारी देण्याचे प्रकार सलग दुसऱ्या वेळा झालेला आहे त्यामुळे वास्तविक पाहता येथील भूमीपुत्राना डावलून बाहेरची शक्ती आमच्या भूमीपुत्राला आव्हान देत असेल तर आमच्या शिंदखेड्याची ताकद या बाहेरच्यांना दाखविण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही सर्व शिंदखेडा मतदारसंघातील भूमिपुत्र एकत्र झालो असून महायुतीने आमच्या तालुक्यातील भूमीपुत्राला उमेदवारी दिली असून त्यांचा प्रचंड मोठा विजय करण्यासाठी आम्ही कंबर कसत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी केले. 


आज जयकुमारभाऊ रावल यांच्या प्रचारासाठी दोंडाईचा पालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्रबापू देशमुख, शिंदखेडा येथील माजी सभापती प्रा सुरेशभाऊसाहेब देसले, हेमंत रावसाहेब साळुंके, सवाई मुकटी येथील जेष्ठ नेते राजेंद्र देसले, माजी नगराध्यक्ष विक्रमबापू पाटील, भडणे चे जेष्ठ नेते साहेबराव आबा खरकार, संजीवनी ताई सिसोदे, वर्षीचे देविदास बोरसे, माजी उपसभापती ललित वारुळे, सुकवद येथील सर्जेराव पाटील सेनेचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील, बाम्हणे येथील कामराज निकम यांच्यासह अनेक दिग्गजांनी जयभाऊ रावल यांच्या समवेत प्रचार करून विरोधकांना सळो की पळो करून सोडले आहे. 

यावेळी श्री. भामरे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये आम्ही गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करीत आहोत पण कायमच स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना उमेदवारी देण्यात येत आहे, वास्तविक पाहता आताचे उमेदवार यांचे घर मुंबईत आहे त्याना मते देऊन आमच्या तालुक्यातील जनतेने समस्या घेऊन मुंबईत जावे का ? त्यापेक्षा आम्ही अर्ध्या रात्री उपलब्ध होणारा दमदार आमदार केवळ निवडूनच नाही तर एक लाखापेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला आहे असेच आवाहन माजी सभापती, प्रा सुरेश देसले, विक्रम पाटील, राजेंद्र देसले, शिवसेनेचे हेमंत साळुंखे, कामराज निकम , साहेबराव खरकार, संजीवनी सिसोदे, रघुवीर बागल, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, महावीरसिंह रावल, उपसभापती रवींद्र पाटील, देविदास कोळी, ललित वारुळे, एल जी पाटील, कल्याण बागल, माजी जि प सदस्य धनंजय मंगळे, महेंद्र पाटील, डी एस गिरासे, डी आर पाटील, वाल्मिक पाटील, संजय देसले, यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध