Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

परतीच्या पावसामुळे कापशीला घट; जिनिंग व्यवसायाला फटका...



  
 
प्रतिनिधी समीर पिंजारी:बोदवड तालुका हा अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात कोणत्याही प्रकारचा पाणी साठा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना केला मात्र यंदा समाधानकारक पावसामुळे पिके चांगली बहरली होती. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण नवरात्र नंतर सतत चालू असलेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील मुंग,उडीद पिकाचे मोठे नऊकसान झाले. तरी शेतकरी कपाशी व मका हातात येईल या आशेवर होते. मात्र या आशेवरही पावसाने पाणी फिरवले. ऐन दिवाळीत ज्वारी, मका, सोयाबीन काढणीच्या वेळेत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांना कोंब फुटले असून कपाशीच्या कैऱ्या मध्ये पाणी तुंगल्याने कैऱ्या खराब होत आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
 
तालुक्यातील बाजारपेठ ही  शेतीच्या मालावर अवलंबून आहे. शहरात दहा जिनिंग असून कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात न आल्याने जिनिंग व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मजुरांचा रोजगार सुद्धा हरवला गेल्याने शेतकऱ्यांसोबत मजुरांची दिवाळी सुद्धा अंधारात गेली. तर गुरा ढोरांना सुद्धा चार नसून मका व ज्वारी चा कडबा पावसाने सडला आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत नुकसान भरपाई द्यावी अशी मंगणी जोर धरत आहे.....

-----------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध