Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा डॉ जितेंद्र ठाकूर यांचे तहसीलदारांकडे निवेदन




शिरपूर:प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतींचे त्वरीत पंचानामा करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी यासंदर्भाचे निवेदन डॉ जितेंद्र ठाकूर यांनी तहसिलदार यांना दिले.



आज दि ३० रोजी शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांना डॉ जितेंद्र ठाकूर यांनी निवेदन दिले.निवेदनात म्हटले की,शिरपूर तालुक्यात सप्टेंबर व आँक्टोंबर २०१९ महिण्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिक पुर्णतः खराब व नष्ट झाले आहेत. तालुक्यातील कापूस, मका,
सोयाबीन,ज्वारी,केळी,बाजरी,मुग,उडीद व पपई अशा पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करत शासन दरबारी सादर करून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी या संदर्भात निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.निवेदनावर मधुकर पाटील, रामकृष्ण महाजन,मिलींद पाटील,राजेंद्र राजपूत,राजकपूर मराठे,जयवंत पाटील आदींसह उपस्थितांचे स्वाक्षऱ्या आहेत.

-----------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध