Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

प्रचार संपताच बाहेरच्यांनी गावं सोडावीत



प्रातांधिकारी सीमा अहिरे यांनी दिला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) शिवाजी पारधी 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमळनेर मतदार संघात बाहेरगावाहून आलेले लोकांनी प्रचाराची मुदत संपताच गाव सोडायचे आहे. त्यामुळे अशी काही लोक मतदारांवर प्रभाव टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
प्रत्येक बुथवर पाळणाघर ठेवण्यात आले असून ३२ केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ७ केंद्रांवर व्हीडिओ ग्राफर तर १३ सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. मुस्लिम बहुल मतदान केंद्रांवर मतदारांच्या ओळखीसाठी एक महिला जादा नेमण्यात आली आहे १४३ क्रमांकाचे बूथ सखी केंद्र म्हणून विशेष ठेवण्यात आले आहे. त्यात सर्व अधिकारी , कर्मचारी व पोलिस देखील महिला आहेत. एनसीसी व एनएसएस तसेच स्काऊट गाईड चे १८ वर्षाखालील विद्यार्थी दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी सेवेत ठेवण्यात आले आहेत. ३२० मतदान केंद्रांसाठी एकूण २३५७ कर्मचारी नेमण्यात आले आहेत, असेही आहिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका कृषी अधिकारी भारत वारे , संजय चौधरी , अभियंता सोनवणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध