Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक



अमळनेरमध्ये  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा  प्रचार करतांना  १२ वर्षाचा मुलगा.   


BY ऑनलाईन तरुण गर्जना
१७ ऑक्टोबर २०१९
पंकज पाटील (उपसंपादक)




अमळनेर मध्ये राजकीय वातावरण  चांगलेच तापू लागले आहे. या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी अशी सरळ लढत आहे.त्यात आता पर्यंत झालेल्या सर्वे नुसार कोणत्याच पक्षासाठी व उमेदवारासाठी  हा मतदार संघ जिंकणे सहजासहजी शक्य नाही. काटे की टक्कर दोन्ही उमेदवारामध्ये असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे.

पण तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करतांना गांधी टोपी ते बालगोपाळ मंडळी देखिल या प्रचारात उतरली आहे.ही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनिल पाटील यांच्यासाठी जमेची बाजू आहे. अमळनेर तालुक्यातील दहिवद –पातोंडा गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या गटातुन एक जि.प सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत.त्याच मतदार संघात एक लहान मुलगा आपल्या सायकलीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा घेवून प्रचार करत आहे.

महाराष्ट्रात शेतकरी बाबत घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नाराज आहे. घरातले आपल्या बापाचे होणारे हाल या बाल मनाच्या डोक्यात तर गेले नसतील ना ? ज्या वयात हातात शाळेची पुस्तक पाहिजेत त्या वयात त्याच्या हातात पक्षाचे झेंडे ही बाब विचार करण्यासारखी आहे. हा लहान स्टार प्रचारक आपल्या गावांत व परिसरात प्रचार करत असून एकच वादा फक्त अनिल दादा ....आपल मत राष्ट्रवादीला... राष्ट्रवादी  पुन्हा असा संदेश जनतेला देत आहे.

जी स्वप्ने दाखवून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली होती त्यापैकी कोणतेही स्वप्न या ग्रामीण जनतेचे  पूर्ण झालेले नाही. शेतकऱ्यांचे जगणे दिवसेंदिवस बिकट व कष्टदायी होत असल्याचे चित्र संपुर्ण देशात आहे. अमळनेर तालुक्यात ना हाताला काम ना शेतीला पाणी. पाडळसरे धरणाचे गाजर आता या जनतेच्या चांगलेच लक्षात आले आहे .जनतेला मुलभुत सुविधा देण्यात व ग्रामीण भागाचा विकास करण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले असल्याचे गावा-गावांत वातावरण व चर्चा आहे. घरात झालेल्या चर्चेचे  वडिलांचे बोल कानावर पडल्यामुळेच या बाल-गोपालाने हातात राष्ट्रवादीचा झेंडा उचलून भुमीपुत्र अनिल पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध