Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

आमदार शिरीष चौधरी यांचा गिरीष महाजन यांनी केला राजकीय घात .


मुख्यमंत्री यांच्या दारातील नंदीने केला घात.



BY ऑनलाईन तरुण गर्जना
२४ ऑक्टोबर २०१९
पंकज पाटील (उपसंपादक)



अमळनेर विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची व अमळनेर  तालुक्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाचा मुद्दा व स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेतून आलेला आवाज भुमीपुत्र चा नारा  ग्रामीण जनतेने चांगलाच उचलत आज अमळनेरच्या भुमिपुत्राला निवडून दिले.आमदार शिरीष चौधरी  यांनी काटे की टक्कर देत पराभव स्विकारला असला तरी हा त्यांचा पराभव नसून राजकीय घात आहे.


पाडळसरे धरणाच्या मुद्द्यावरून अमळनेर तालुक्यात चांगलेच वातावरण तापले होते .धरणाचा मुद्दा जनतेने लावून धरला होता.पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या व्यासपीठावर आमदार शिरीष दादा यांनी नामदार गिरीश महाजन यांना अप्रत्यक्ष टोला लगावत मी मुख्यमंत्री यांच्या दालनातील नंदी नसून मी राम भक्त हनुमान आहे. मला मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही असे सांगितले होते. ही गोष्ट नामदार विसरले नव्हते .त्यामुळेच पक्षाच्या तिकिटावर लढण्यासाठी त्यांनी विद्यमान आमदार यांना दम भरला होता.

जळगांव जिल्ह्यात नामदार गिरीश महाजन यांच्या पेक्षाही जवळचे संबध मा.मुख्यमंत्री  यांच्याशी शिरीष दादा चौधरी यांचे होते .या निवडणुकीत ते निवडून आले असते तर निश्चितच त्यांचे स्थान गिरीश महाजन यांच्या पेक्षा जवळचे राहिले असते .त्यासाठीच कार्यसम्राट यांचा राजकीय घात नामदार यांनी केला .आमदार शिरीष दादा हे जर अपक्ष उभे राहिले असते तर अमळनेर विधानसभा मतदार संघ हा त्यांच्यासाठी कायमचा राखीव झाला असता. दोन मराठ्यांच्या पानिपतात त्यांचा विजय पक्का होता. त्यासाठी त्यांनी पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष म्हणून लढनेच फायदेशीर होते.

पण ते म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे हे पुर्वजांनी सांगितलेले वाक्य खोटे नाही. आमदार शिरीष दादा यांच्या झोळीत देखिल लोकांनी मते टाकलेली आहेत. पण विजयाचा कौल भुमिपुत्राच्या बाजूने देत अमळनेरला लागलेला कलंक आज पुसण्यात आला आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध