Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज लोकनायक बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभेत


शेतकऱ्यांचा बुलंद आवाज लोकनायक बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभेत
 

मोदी लाटेत सुद्धा स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणारे एकमेव व्यक्तिमहत्व  बच्चू कडू
 
BY ऑनलाईन तरुण गर्जना
२४ ऑक्टोबर २०१९
पंकज पाटील (उपसंपादक)
 
अचलपूर  विधानसभा मतदार संघातून सलग चौथ्यांदा लोकनायक बच्चू कडू निवडून आलेले आहेत. त्यांच्या कार्याचा ठसा संपुर्ण महाराष्ट्रात असून ते जनतेचे सेवक म्हणून निरंतर काम करत आहेत.
गेल्या पाच वर्षापासून विरोधी पक्षाचा आवाज फक्त आमदार बच्चू कडू यांच्या जवळ असून त्यांनी त्यांची ही प्रथा खंडीत न होता चालू ठेवली आहे. आजपर्यंत अचलपूर मतदार संघात त्यांनी शेतकऱ्यांसाठी छोटी-मोठी धरणे ,आरोग्य सुविधा , अपंग ,दिन-दुबळे यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यांची आमदाराची राहुटी हा कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यांच्या विविध आंदोलनामुळे ते जनतेच्या मनात घर करून बसले आहेत.
 त्यांनी या पंधरा वर्षात जनतेच्या हिताची व शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम केल्यामुळेच त्यांचा विजय निश्चित होताच .या पाच वर्षात त्यानी संपुर्ण महाराष्ट्रात अपंग निधीवर फडणवी सरकारला धारेवर धरत अपंग निधी खर्च करण्यास भाग पाडले आहे.गांव तिथे प्रहारच्या माध्यमातून त्यांचे तालुका प्रतिनिधी काम करत असून पुढील पाच वर्षात त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचेल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध