Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

मुंबई येथे देवगाव देवळीचे शिवाजी महाजन क्रांतिसूर्य महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार२०१९ने सन्मानित,मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव




शिवाजी महाजन सारख्या तरुणांनी सामाजिक कार्यात मोठ्यासंख्येने सहभागी होऊन सक्रिय होणे ही काळाची गरज-लावणी समशेर ,सिनेअभिनेत्री - विजया पालव


अमळनेर प्रतिनिधी:शिवाजी महाजन 
तालुक्यातील आदर्शगाव देवगाव देवळी येथील युवा सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार शिवाजी महाजन यांना आपल्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुंबई येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2019 रोजी पत्रकार भवनात भारतीय समाजोन्नती संघातर्फे दिला जाणारा क्रांतिसूर्य महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार शिवाजी महाजन यांना मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला,यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे,मा एकनाथजी खोल्लम साहेब (26/11हल्यातील राष्ट्रीय पदक विजेता व कर्तबगार पोलीस अधिकारी व निवृत्त अतिरिक्त पोलीस आयुक्त) ,मा विजया पालव(प्रसिद्ध लावणी समशेर व प्रख्यात सिने अभिनेत्री) व अनेक मान्यवर उपस्थित होते


लावणी समशेर,सिनेअभिनेत्री - विजया पालव यांनी शिवाजी महाजन यांच्याशी बोलताना सांगितले सद्याचा काळात  तुमच्या सारख्या तरुणांनी सामाजिक कार्यात मोठ्यासंख्येने सहभागी होऊन सक्रिय होणे ही काळाची गरज त्यांनी सांगितले

शिवाजी महाजन हे पत्रकार असून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात त्यांचे नाव चर्चेत आहे महाजन सदैव सामाजिक कार्यात तत्पर असतात व विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध