Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

लावणी क्वीन व सिने अभिनेत्री विजया पालव यांना मुंबई येथे महाराणी अहिल्याबाई होळकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित,त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव





अमळनेर प्रतिनिधी :शिवाजी महाजन:
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताला आपल्या लावणीने वेड लावणारी,लावणी क्वीन व प्रसिद्ध सिने अभिनेत्री विजया पालव यांना भारतीय समाजोन्नती संघ आयोजित पत्रकार भवन येथे प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले तसेच महाराणी अहिल्याबाई होळकर समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरस्कार देतांना 26/11 च्या हल्ल्यातील राष्ट्रीय पदक विजेता कर्तबगार पोलीस अधिकारी व निवृत्त अतिरिक्त पोलीस आयुक्त मा.श्री एकनाथजी खोल्लम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि विशेष म्हणजे नृत्य व्यतिरिक्त त्यांच्यात एक समाजसेविका ही आपण म्हणू शकतो,अनेक ठिकाणी त्यांनी होईल तेवढी मदत लोकांना केली 

आहे,लावणी_नृत्य_समशेर म्हणून गौरवण्यात आले तेव्हा त्यांचा काळजाचा ठोका जवळपास चुकलाच होता.यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे.असेच आशीर्वाद व प्रेम असुद्या असे लावणी समशेर सिने अभिनेत्री विजया पालव यांनी सांगितले,यावेळी आणखी सामाजिक ,पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींच्या ही क्रांतिसूर्य महात्मा फुले समाजभूषण व महाराणी अहिल्याबाई होळकर समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांचे अमळनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता शिवाजी महाजन पत्रकार ,मुंबई येथील शोभाताई रासकर,संगीता पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध