शिरपूर:प्रतिनिधी
शिरपूर विधानसभा निवडणूकीची आज मतमोजणी झाली यात एकुण २ लाख १० हजार ९०५ मतदान झाले होते.यात भाजपाचे उमेदवार काशिराम पावरा यांंना १ लाख १८ हजार ८९४ ईतके तर डॉ जितेंद्र ठाकूर यांना ७० हजार ३७१ ईतके मतदान मिळाले.यात काशिराम पावरा यांनी हँट्रीक केली असुन एकुण ४८ हजार ५१३ ईतक्या मताधिक्याने काशिराम पावरा विजयी झाले.
निकाल ऐकण्यासाठी शिरपूर शहरातील मुकेश पटेल टाउन हाँल येथे जमलेल्या तालुक्यातील नागरिकांंनी भर पावसात जल्लोष केला.सकाळी ८ वाजेपासून भर पावसात नागरिक निकालाच्या उत्साहात उभे होते.
निकाल लागल्यानंतर संपूर्ण शहरात आ काशिराम पावरा यांची विजयी रँली काढण्यात आली.
या निवडणुकीच्या माध्यमाने शिरपूर तालुक्यात प्रथमच भगवा फडकला असून भाजपचे उमेदवार विधानसभेवर विजयी झाले आहेत. शिरपूर तालुक्याने पुन्हा एकदा भाजपाकडे आपला कल दिला असून तालुक्यात आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वास प्रथम पसंती दिली असून जननायक म्हणून प्रसिद्ध झालेले डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. मोठ्या मताधिक्क्याने विजय झाल्यामुळे तालुका भरात समर्थकांचा जल्लोष सुरू असून वाद्याच्या तालावर व मिरवणूक काढून समर्थकांचा जल्लोष होत आहे. यात अनेकांनी आमदार पावरा यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा