Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

शिरपूर तालुक्‍यात अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळण्यासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करा -



आमदार काशिराम पावरा यांनी तहसील कार्यालयात तातडीची आढावा बैठकीत दिल्या कडक सूचना

शिरपूर: प्रतिनिधी :तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सर्व अधिकारी यांना दिले असून शेतकरी बांधवांना योग्य ती शासकीय मदत करण्या संदर्भात तहसीलदार आबा महाजन यांच्याशी चर्चा करून शुक्रवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवीन तहसील कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेण्यात आली.

आमदार काशीराम पावरा तहसील कार्यालयात आयोजित तातडीची आढावा बैठकीत कडक सूचना देतांना म्हणाले, शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न शेती आहे. तालुक्यात अतिवृ्टीने मोठे नुकसान झाले आहे. मनापासून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे सर्व प्रकारचे पिकांचे पंचनामे करावे. योग्य तो लाभ मिळावा यासाठी प्रयत्न व्हावे. सर्व अधिकारी, सर्कल, ग्रामसेवक, तलाठी यांनी योग्य ते पंचनामे करावे, सतर्क राहून सर्वांनी काम करावे. तसेच पिक विमा कंपनीचे अधिकारी यांनीही योग्य ते पंचनामे करुन तात्काळ लाभ देण्यासाठी यंत्रणा कामाला लावावी. पिक विमा योजना साठी सरसकट सर्व विमाधारक लाभार्थी शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करावे. शेतकरी बांधव आमच्यासाठी सर्वकाही असून त्यांना तातडीने लाभ द्यावा. तसेच तहसीलदार यांनी तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना व विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महसूल विभागाकडून अंमलबजावणी करावी. बैठकीस बीडीओ का आले नाही याबाबत कडक शब्दात विचारणा केल्यानंतर ते बैठकीस उशिरा दाखल झाले. नुकसान पंचनामे बाबत कामचुकारपणा केला तर संबंधीत अधिकारी, तलाठी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

तातडीच्या आढावा बैठकीस तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, नाशिक विभाग म्हाडा उपसभापती बबनराव चौधरी, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी निकुंभ, गटविकास अधिकारी शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, माजी जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष के. डी. पाटील, कृउबा सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, घोडसगाव चे प्रकाश पाटील, वसंतराव पाटील, शिवसेनेचे राजू टेलर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, आबा धाकड, चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष भरतसिंग राजपूत, माजी पं.स.उपसभापती संजय पाटील, अभिमन गुजर, प्रकाशसिंह सिसोदिया, कैलास भामरे, संतोष जाधव, संग्रामसिंग राजपूत, भटू माळी वरवाडे, अविनाश पाटील, विक्की चौधरी, शेखर माळी, महेंद्र पाटील, महेश लोहार, स्वप्निल राजपूत, श्रीकृष्ण शर्मा, राजेश गुजर, विजयसिंह राजपूत, अधिकारी, भाजपा, शिवसेना पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बबनराव चौधरी, प्रभाकरराव चव्हाण, तुषार रंधे, नरेंद्रसिंह सिसोदिया, देवेंद्र पाटील, हेमंत पाटील, संजय पाटील, विजयसिंह राजपूत व शेतकरी बांधव यांनीही चर्चेत सहभाग घेतला.


यावेळी तहसीलदार आबा महाजन म्हणाले, आमदार काशिराम पावरा यांच्या सुचनेनुसार नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. कोणीही कामचुकारपणा केला तर अशा तलाठी, ग्रामसेवक कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अतिशय परदर्शीपणे काम करण्यात येईल. एकही शेतकरी पंचनामे व लाभापासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. तालुक्यातील काम तातडीने होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

यावेळी पिक विमा योजनेबाबत सुभाष पवार यांनी माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध