Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर तालुक्‍यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्याने आमदार काशीराम पावरा यांनी शुक्रवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात आयोजित केली तातडीची बैठक





शिरपूर:प्रतिनिधी : तालुक्‍यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सर्व अधिकारी यांना दिले असून शेतकरी बांधवांना योग्य ती शासकीय मदत करण्या संदर्भात तहसीलदार आबा महाजन यांच्याशी चर्चा करून शुक्रवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवीन तहसील कार्यालयात तातडीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार काशीराम पावरा यांनी आयोजित केलेल्या या तातडीच्या बैठकीस तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या तातडीच्या बैठकीस आमदार काशीराम पावरा, नाशिक विभाग म्हाडा उपसभापती बबनराव चौधरी उपस्थित राहतील.

तहसीलदार आबा महाजन, कृषी अधिकारी, सर्व अधिकारी, भाजपा, शिवसेना व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध