Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

जळगाव जिल्ह्यात अती पावसामुळे सर्व शेती पिके नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून दुष्काळाच्या निकषाची मदत मिळणे बाबतची मागणी







जळगाव जिल्ह्यात अती पावसामुळे सर्व शेती पिके नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून दुष्काळाच्या निकषाची मदत मिळणे बाबतची मागणी निवेदनाद्वारे  सोपान पाटील यांनी केली
 जळगाव जिल्ह्यात रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने सर्व पिक परीस्थिती उत्तम होती.अगोदर उडीद मुग  चवळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातची गेली नंतर थोडा 
पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला.ज्वारी कापूस मका सोयाबीन कापणीच्या तयारीत असतानाच परत सतत धार परतीचा पाऊस सुरू झाला हाती तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला ज्वारी कापनीवर होती कापुस वेचणीवर होता पाऊस थांबवण्याची शेतकरी प्रतिक्षा करीत होता परतिचा पाऊस नथांबता अनेक दिवस सुरूच राहील्याने ज्वारीच्या उभ्या व कापलेल्या ज्वारीस अकुंर कोंब फुटले त्याच प्रमाने मका, कपासी,सोयाबीन,भुईमूग सर्वच पिकाची स्थिती निर्माण झाली आहे तसेच  सतत तपमानात घट राहील्याने केळीवर सुध्दा रोग पडल्याने अनेकांनी महागडी केळीची टिशुची रोप लावुन केळी जगवली होती ती रोग पडल्यामुळे वअळी पडल्याने केळी उपडून नष्ट करावी लागली शेतकऱ्यांची आनंदात जाणारी दिवाळी अतीशय चिंतेत गेली पुर्ण हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडलेला आहे अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्ती बोंडअळी,लाल्या,करपा, दुष्काळ ,गारपिट, अतिवृष्टी या अनेक कारणांमुळे आज शेतकरी थकलेल्या आवस्थेत आहे शेतकरी कर्जाचा डोंगराखाली दबलेला आहे त्यातच यावर्षी नविन संकट ओला दुष्काळ पडला आसल्याने शेतकरी सरकारकडे मोठ्या आपेक्षा बाळगून आहे त्यासाठी शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना पंचनाम्याचे नाटक न करता व वेळ काढु धोरण न राबवता सरसकट शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे नुकसान झालेले आसल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी व दुष्काळाचे निकष लावून भरीव पकेजची घोषणा

 करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,लाईट बिल माफ करावे,कर्जवसुलीस स्थगिती द्यावी,नविन रब्बीचा हंगाम उभा करण्यासाठी रोखीची मदत द्यावी  यासह दुष्काळाचे सर्व निकष लावून भरीव मदत देवुन दिलासा द्यावा  ही आग्रहाची विनंती याप्रकारची मागणीचे निवेदन
सोपान बाबुराव पाटील जिल्हाध्यक्ष 
राष्ट्रवादी किसान सभा जळगाव यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना दिले त्यांच्या प्रती

मुख्यमंत्री,कृषीमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री,
मुख्यसचीव मंत्रालय,
सचिव कृषी,

सचीव मदत पुनर्वसन,
जिल्हाधिकारी ,जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव. यांना 


निवेंदन दिले त्यावेळी संजय चव्हाण जिल्हा कार्यालयीन सचीव रमेश पाटील माजी जि प सदस्य रामधन पाटील किसान सभा तालुकाध्यक्ष एरंडोल ईत्यादी हजर होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध