Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

अमळनेर नगरपालिकेला सहा कोटी बत्तीस लाख निधीची मान्यता






अमळनेर नगरपालिकेला सहा कोटी बत्तीस लाख निधीची मान्यता  




BY ऑनलाईन तरुण गर्जना

०३ नोव्हेंबर २०१९

पंकज पाटील (उपसंपादक) ,अमळनेर - नगरपालिकेला १४ वित्त आयोग निधी अंतर्गत अनुदान वितरीत करण्यात आले आहे.१४ केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना वितरीत करण्यासाठी सन २०१९-२०२०च्या मुलभूत अनुदानाच्या हप्त्यापोटी रुपये १४८९.५१ कोटी  नगर विकास विभागामार्फत ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी वितरीत करण्यात आला आहे.

१४ वित्त आयोगाचा निधी हा लोकसंख्या क्षेत्रफळ या निकषा आधारे सर्व पात्र ‘ड’ वर्ग महानगरपालिका ,नगरपरिषदा व नगर पंचायतींना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या मान्यतेनुसार अमळनेर शहराच्या विकासासाठी ६ कोटी ३२ लक्ष ४९ हजार ४८८ निधी ला मान्यता मिळाली आहे . लवकरच तो निधी अमळनेर शहराच्या विकासासाठी प्राप्त होणार आहे.

सदर अनुदानातून खर्च करतांना शासन निर्गमित करेल अशा शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार खर्च  करणे बंधनकारक असेल. अमळनेर शहरातील नागरिकांनी जागृत राहून निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहणे देखिल गरजेचे आहे.शासन हा पैसा जनतेच्या विकासासाठी देत असून तो पैसाही जनतेचाच असल्याने ते जाणून घेण्याचा अधिकाजनतेला आहे. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी अमळनेर शहराचा केलेला  विकास हा तालुक्याचा नजीक असलेल्या तालुक्यांपेक्षा निश्चितच कौतुकास्पद आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध