Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

रणाईचे येथे जि.प. प्राथमिक डिजिटल मराठी शाळेत स्नेहसंमेलन समारोह संपन्न.


प्रतिनिधीशिवाजी पारधी : रणाईचे येथील जि. प. प्राथमिक मराठी डिजिटल शाळा अंतर्गत आयोजित दि. २५ फेब्रुवारी रोजी 'बालतरंग' हा कार्यक्रम सायंकाळी ८ ते ११ यावेळेत पार पडला. यावेळेस जानवे केंद्राचे केंद्रप्रमुख शरदजी सोनवणे यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविकेत उपशिक्षक भानुदास पवार सर यांनी लोकसहभागातून मिळालेले १,१०,८०० व विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतील वाढ यावर दृष्टिक्षेप टाकत जि प प्राथमिक शाळेकडे आधुनिकतेच्या व डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारभुत करून यापूर्वी ६८ पटसंख्या असलेली मराठी शाळा आज डिजिटल युगात प्रगती करून पटसंख्या १२० वर येऊन ठेपली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर दृष्टीक्षेप टाकत प्रोजेक्टरच्या माध्यमातून ग्रामस्थांना कार्यक्रमाच्या सुरुवातीस आजतागायत राबविलेले उपक्रम, विविध स्पर्धा, दैनंदिन व्यवहारात मापके, संख्यावाचन, वस्तुओळख इत्यादी घटकांवर आधारीत विडिओ दाखवण्यात आला.


विशेष जि प प्राथमिक मराठी डिजिटल शाळेत १ ते ४ वर्ग असून शाळेतील प्रत्येक वर्ग हा डिजिटल असून सर्व प्रकारच्या सुविधा शालेय आवारात उपलब्ध आहेत. ६३ मुले व ५७ मुली अशी एकूण १२० पटसंख्या शाळेतील आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश सुमनाने 'विघ्नहर्ता' या गीतावरील नृत्याने झाली. विविध कलागुणांचा अविष्कार या कार्यक्रमातून दिसून आले. शेतकऱ्यांची प्रत्यक्ष परिस्थिती शेतकरी राजाची पहाट कशी 'झुंजूमंजू' सुरू होते हे या गीतातून सादर केली. ' एकच राजा इथे जन्मला' ह्या गीतांला प्रेक्षकांची दाद मिळविली तर संदेशे आते है, या गीतावरील नृत्याने प्रेक्षकांचे डोळे पाणावले. 'गोंधळ', दिल है छोटासा अशा प्रतियोगिक १३ गीतांवर नृत्य सादर केले. तर सैराट शौचालय या प्रबोधनपर नाटकाने चांगलीच वाहवा मिळविली. 'व्यसनमुक्ती' 'फुकट दाढी' या नाटकाने धमाल हसवले तर सर्वधर्मसमभाव या नाटकाने भारतीय संस्कृती त्यात आपलेपणा कसा राखला हवा यावर या बाल कलाकारांनी सादरीकरण केले.


याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र वंजारी व सर्व सदस्य, तसेच जानवे केंद्राचे केंद्र प्रमुख शरद सोनवणे, पत्रकार योगेश्वर मोरे, सरपंच मीराबाई सोनवणे, रणाईचे खु. सरपंच प्रकाश बंजारा व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील विविध मंडळातील तरुणांनी तर शाळेचे मुख्याध्यापक सतीश ढोले, शिक्षक भानुदास पवार, शिक्षिका रुपाली पाटील, वर्षा पवार आदींनी मेहनत घेतली.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध