Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

फॅमिली फिजिशिअन्स ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


इंदिरानगर वार्ताहर : फॅमिली फिजिशिअन्स असोसिएशन, नाशिक ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कालिका मंदिर सभागृहात आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रमोद आहेर होते तर केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद (सीसीआयएम) सदस्य डॉ.ज्ञानेश्वर थोरात विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

व्यासपीठावर संस्थेच्या सचिव डॉ.सुनंदा भोकरे, खजिनदार डॉ.पंकज देवरे, माजी अध्यक्ष डॉ.स्मिता कांबळे, सहसचिव डॉ. प्रदीप गवळी, उपाध्यक्ष डॉ.प्रतिभा जोशी , डॉ.विजय निकुंभ, सुसंवाद संपादक डॉ.विनय मोगल,उपसंपादक डॉ. संजय रकीबे, संघटक डॉ.संजय दाभाडकर, डॉ.शीतल सुरजूसे उपस्थित होते.

डॉ.भोकरे यांच्या प्रास्ताविकानंतर डॉ.आहेर यांनी सभेचा उद्देश, पटलावरील विषय व संस्थेच्या गतकाळातील वाटचालीचा आढावा घेतला. यानंतर पदाधिकाऱ्यांचे अहवाल सादर करण्यात आले. एफपीए भवन, सर्व प्रकारच्या सभासदांचे शुल्क, प्रमाणपत्रे, ऐनवेळी मांडण्यात आलेले विषय यावर सविस्तर चर्चा होवून योग्य निर्णय घेण्यात आले. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वांचा हातभार लागणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्वच वक्त्यांनी व्यक्त केले. सभेस संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, माजी अध्यक्ष व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो: फॅमिली फिजिशिअन्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस संबोधतांना अध्यक्ष डॉ.प्रमोद आहेर. समवेत डॉ.ज्ञानेश्वर थोरात, डॉ.सुनंदा भोकरे, डॉ. पंकज देवरे, डॉ.स्मिता कांबळे व इतर पदाधिकारी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध