Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
धक्कादायक…राज्यात एका वर्षात सापडले एवढे कुष्ठरोगी !
मुंबई:प्रतिनिधी:राज्यात १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत राबविलेल्या शोध मोहिमेत ६ हजार ११६ नविन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले असून, एप्रिल २०१९ ते डिसेंबर,२०१९ या कालावधीत राज्यामध्ये १३ हजार ८३५ नागिन कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यात आल्याची माहिती विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामुळे समोर आली आहे.
राज्यात कुष्ठरोगांच्या संख्येत वाढ होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य विकास ठाकरे यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केला होता. त्याला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील माहिती उघड झाली आहे. १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत राबविलेल्या शोध मोहिमेत ६ हजार ११६ नविन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले असून, एप्रिल २०१९ ते डिसेंबर,२०१९ या कालावधीत राज्यामध्ये १३ हजार ८३५ नागिन कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.या सर्व रुग्णांना बहुविध औषधोपचार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती कुष्ठरोगाचे रूग्ण ?
एप्रिल,२०१९ ते डिसेंबर,२०१९ या कालावधीत राज्यात कुष्ठरोगाचे सर्वाधिक नविन रुग्ण अनुक्रमे चंद्रपूर (१३६२), पालघर (१०६९), नाशिक(८७७), गडचिरोली (८७५) या चार जिल्हयात आहेत. भंडारा जिल्हयामध्ये (३९४) व गोंदिया जिल्हयामध्ये (३४७) नविन कुष्ठरुग्ण आहेत. नवी मुंबईवगळता ठाणे शहरासह कल्याण, उल्हासनगर व मीरा-भाईंदरसारख्याशहरांमध्ये सन २०१८-२०१९ च्या तुलनेमध्ये सन २०१९-२०२० डिसेंबर अखेरमध्ये नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच मायक्रो बॅक्टेरिअम लेप्री या जंतुची पावर वाढली असल्याचे आढळून आले नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या राज्य व जिल्हास्तरीय सभेमध्ये कार्यक्षेत्रनिहाय नियमितपणे आढावा घेतला जातो व जिल्हास्तरावरुन प्रत्यक्ष भेटीद्वारे पडताळणी केली जाते. त्यामुळे वर्ग चौकशी केली जात नाही. सदर शहरामध्ये स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण दाट लोकवस्ती व दीर्घ कालावधीचा अधिशयन काळ यामुळे कुष्ठरोगाचे रूग्ण आढळत आहेत असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर आगाराच्या शिरपूर-पुणे बसमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला अरेरावी करत बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग अस...
-
सध्या साक्री तालुक्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (Private Agriculture Markets) झपाट्याने सुळसुळाट होत असून, प्रत्येक गावाच्या कोपऱ...
-
धुळे,नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात द...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा