Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीरसिंह नियुक्ती



मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीरसिंह नियुक्ती श्री. संजय बर्वे, भापोसे हे दिनांक २९.०२.२०२० (म.नं) रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृतीमुळे रिक्त होणाऱ्या पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई या पदावर शासनाने सन १९८८ च्या तुकडीतील श्री.परम बीर सिंह, भापोसे, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस महासंचालक दर्जाच्या बदलीने नियुक्ती केली आहे.

तसेच श्री.परम बीर सिंह, भापोसे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. बिपिन के.सिंग,भापोसे (१९९०), अपर पोलीस महासंचालक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,म.रा.मुंबई यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध