Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जून, २०२०

धुळे जिल्ह्यात आणखी आठ कोरोना पॉझीटीव्ह..!



धुळे प्रतिनिधी: जिल्ह्यातील आणखी आठ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.
साक्री येथील पाच व धुळे शहरातील तीन रूग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

साक्री तालुक्यातील दहिवेल येथील ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच साक्री शहरातील एकता नगर परिसरातील २४, २६ व २८ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. तसेच चांदतारा मोहल्ला, साक्री येथील ५ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. 

धुळे शहरातील काझी प्लॉट येथील २६ वर्षीय महिला, इस्लाम पुरा देवपूर येथील ६३ वर्षीय पुरूष व गजानन कॉलनी परिसरातील २१ वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध