Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ जून, २०२०

पत्रकारांवर जीवघेणा हल्ला...! लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात...!




शिरपूर प्रतिनिधी:वृत्तांकनासाठी गेलेल्या क्राईम एफ.आय.आर.चे प्रतिनिधी रेयाजोद्दिन शेख शकील अहमद या पत्रकाराला शिरपूर येथील अंबिका नगर येथील दीपक महाजन उर्फ पिंट्या, सोनू शेट्ये, झिंगा भोई, महेंद्र निंबा पारधी, विजू निंबा पारधी या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. 

त्यात हा पत्रकार जबर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय उपजिल्हारुग्णालय शिरपूर येथे दाखल करण्यात आले आहे. या भ्याड हल्ल्याचा क्राईम एफ आय आर न्यूज परिवार तीव्र शब्दात निषेध नोंदवतो ! तसेच संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करतो. लोकशाहीचा चौथा आधारसत्म्भ असलेल्या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणे हा सुसंस्कृतपणा नव्हे. 

अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शासनाने अद्दल घडवणे आवश्यक आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारावर हल्ला कारणे ही अत्यंत शरमेची बाब असून शासनाने या पत्रकाराला न्याय द्यावा. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करावी. पत्रकाराच्या संरक्षणासाठी त्वरित ठोस पाउल उचलण्याची गरज आहे. 

क्राईम एफ आय आर तर्फे सर्व पत्रकार संघांना याद्वारे आवाहन करतो की, पत्रकारांची होणारी मुस्कटदाबी थांबविण्यासाठी तीव्र आंदोलनाची गरज आहे. नुसते कीट वाटून चालणार नाही. 

तर गुन्हा नोंद होऊन ठोस कारवाई करण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न कारणे गरजेचे आहे...!


1 टिप्पणी:

प्रसिद्ध