Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ मे, २०२१

सध्याची परिस्थिती पाहता कोरोनामुळे सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय.




सध्याची परिस्थिती पाहता कोरोनामुळे  सगळ्यांचच  आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू लस मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट  पूर्णपणे जाईल याची अजून तरी शास्वती मिळालेली नाही, त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी आपले महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून या कोरोना महामारीवर विजय मिळवण्यासाठी योग्य व समाजहिताच्या उपाययोजना करत आहे. 

त्यासोबतच ह्या कठीण परिस्थितीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जितेंद्र आव्हाड युवा मंच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गृहनिर्माण मंत्री मा.ना.डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या आदेशानुसार तसेच जितेंद्र आव्हाड युवा मंच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय एड.प्रमोददादा सरोदे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कोरोना महामारी च्या काळात जनसामान्य लोकांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर करून त्यांना मदत करण्याचे कार्य जितेंद्र आव्हाड युवा मंच चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे आपली जबाबदारी रात्रंदिवस प्रामाणिकपणे पार पाडत आहेत आणि पुढे देखील ही जबाबदारी पार पाडत राहतील.

महाराष्ट्र प्रशासनाला सहकार्य करत जितेंद्र आव्हाड युवा मंच या  कोरोना महामारीच्या काळात  सामान्य लोकांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जितेंद्र आव्हाड युवामंच विविध जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांचे नंबर प्रसिद्ध करत आहोत.कृपया सर्व लोकांनी ह्याची नोंद घ्यावी आणि कोरोना संबंधित काही अडचण असल्यास निसंकोच ह्यांना कॉल करावा. असे आव्हान जितेंद्र आव्हाड युवा मंचचे धुळे जिल्हाध्यक्ष गौरव पाटील यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध