Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ मे, २०२१

वाघाडी येथे संत भीमा भोई यांची १७१ वी जयंती उत्साहात साजरी..!



शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे भोई समाजाचे आराध्य दैवत तथा राष्ट्रीय संत कवी श्री भीमा भोई यांची १७१ वी जयंती २५ मे रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  भोई समाज सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष पुनमचंद मोरे व ईश्वर मोरे यांचा उपस्थितीत प्रतिमा पुजन करण्यात आले. 

गावात दरवर्षी श्री संत भीमा भोई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले आहे, म्हणून भोई समाज बांधवांनी यावेळी केवळ प्रतिमा पुजन करून जयंती साजरी केली . याप्रसंगी विक्की मोरे,युवराज वाडीले , ज्ञानेश्वर मोरे,प्रशात मोरे,ज्ञानेश्वर कोळी , विशाल मोरे,ईश्वर भोई ,प्रशांत मोरे,मयुर कोळी,सागर मोरे,हर्षल पाटील,राहुल चिते,जितु कोळी,गणेश मोरे,अजय कोळी , अजय कोळी,अंर्जून भिल,मयूर पाटील, कृष्णा मोरे,भावेश मोरे आदी अनेक समाज बांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध