Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १० जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची बदली रद्द करा: बिरसा फायटर्सची मागणी
डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची बदली रद्द करा: बिरसा फायटर्सची मागणी
नंदुरबार : डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे झालेली बदली तात्काळ रद्द करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार के.सी.पाडवी व अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष मनोज पावरा,महासचिव राजेंद्र पाडवी,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महानिरीक्षक केशव पवार,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी,राज्य प्रवक्ता रोहित पावरा,धुळे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा,नंदुरबार जिल्हाध्यक्ष साहेबराव कोकणी,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुका अध्यक्ष प्रा.संपत वसावे,शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वळवी,बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,मालेगाव तालुका अध्यक्ष शरद जाधव,नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे,पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी, व अनेक बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवेदन पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अपर मुख्य सचिव (सेवा) सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई-400032 यांचा दिनांक:09/07/2021 रोजीचा बदली आदेशान्वये डाॅ. राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे बदली करण्यात आली आहे. हे ऐकून नंदुरबार वासीय तसेच अनेक आदिवासी बांधवांची नाराजी निर्माण झाली आहे. कारण नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा अनेक वर्षापासून अजूनही दुर्लक्षित असून विकासापासून वंचित आहे.ब-याच वर्षांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यात डाॅ.राजेंद्र भारूड सारखे आदिवासी समाजाचे जिल्हाधिकारी जे आदिवासींच्या समस्या जाण असणारे जिल्हाधिकारी लाभले. डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे आदिवासींच्या समस्या ब-यापैकी माहिती आहेत आणि त्यादृष्टीने त्यांचे नंदुरबार जिल्ह्यात चांगले काम सुरू होते.
कोरोना काळात जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारूड यांनी उत्तम रित्या काम केलेले आहे."नंदुरबार बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा"अशा बातम्या देशभर प्रसारित झाल्या आहेत. संपूर्ण देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांच्या ऑक्सीजन प्लांट व कोरोना नियंत्रण आणण्याच्या कामाचे कौतुक केले गेले . सुपरस्टार फिल्म अभिनेता अजय देवगण , अमिर खान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे,महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव सिताराम कुंटे,हिंदी न्यूज,मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर मा.उच्च न्यायालयाने सुद्धा कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले आहे. अशा कौतूकस्पद प्रशासकीय कामगिरी बजावणा-या जिल्हाधिकारीची नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याच्या विकासकामांसाठी अत्यंत गरज आहे.
नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार करून संपूर्ण देशसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबार साठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नंदुरबार वासीय व आदिवासी जनतेच्या हिताचा व भावनांचा विचार करून कर्तव्य दक्ष,आदिवासी समाजाच्या समस्यांची जाण असणा-या,नंदुरबार जिल्ह्याचे नावलौकिक करून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात भर पाडणा-या डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण पुणे येथे झालेली बदली त्वरित रद्द करावी व डाॅ.राजेंद्र भारूड यांना जिल्हाधिकारी नंदुरबार याच पदावर ठेवून सेवेची संधी द्यावी. अशी मागणी बिरसा फायटर्सतर्फे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सह अनेक पदाधिकारी यांनी केली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा