Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १० जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
अहिल्या क्रांती विकास प्रतिष्ठाण प्रेरित क्रांती शौर्य सेना संस्थापक अध्यक्ष :- कल्याणी वघमोडे
अहिल्या क्रांती विकास प्रतिष्ठाण प्रेरित क्रांती शौर्य सेना संस्थापक अध्यक्ष :- कल्याणी वघमोडे
1)ओबीसी आरक्षणाचे फक्त राजकारण नक... 2)राज्य व केंद्र सरकारने धनगर आरक्षण बाबत देखील आपली भूमिका स्पष्ट करावी - कल्याणी वाघमोडे
3) ओबीसींच्या रोषामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत - कल्याणी वाघमोडे
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आपण सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या खडाजंगी सुरू आहेत .
वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेले आहे.
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी उठाव पाहायला मिळत आहे.सर्व ओबीसी संघटनाकडून दाद मागण्यासाठी आंदोलन, मोर्चे द्वारे निवेदन देण्यात येत आहेत .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच उपमुख्यमंत्री,ओबीसी कल्याण मंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना मेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.ओबीसी आरक्षणाचे फक्त राजकारण सत्ताधारी व विरोधी पक्षांनी करू नये तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे धनगर आरक्षण बाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी,दुरुस्ती अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द करावा आणि केंद्र सरकारने ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात केलेल्या वक्तव्याला जागावे,असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले .
दि.४ मार्च, २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने 'विकास किशनराव गवळी वि. महाराष्ट्र सरकार (रिट याचिका क्र. ९८०/२०१९)' या खटल्याच्या निकालानुसार अकोला, वाशिम,गोंदिया,नागपूर,धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरविले.याबाबतची राज्यसरकारची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दि.२८ मे रोजी फेटाळली आहे.
राज्यशासनाने वेळीच याची दखल घेतली असती आणि न्यायालयात भक्कमपणे ओबीसींची बाजू मांडली असती,तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत.तरी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द न होता अबाधीत राहिलेच पाहिजे.्याची दक्षता व कार्यवाही राज्यशासनाने करावी. महाराष्ट्र शासनाच्या या अतिशय महत्त्वाचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दिरंगाई केली. याला महाराष्ट्र शासन आणि विशेषत:ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून सर्व ओबीसी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत .
ओबीसी चळवळीच्या मागणीवरून मंडल आयोग व घटना दुरुस्ती ७३ व ७४ ची अंमलबजावणी करून १९९४ साली हे आरक्षण लागू करण्यात आले होते.२७ टक्के आरक्षण राज्यातील सर्व भटके विमुक्त ,अ,ब,क,ड आणि विमाप्र,ओबीसी यांना एकत्रित मिळून होते . शिक्षण आणि शासकीय नोकरी यात भटके विमुक्त, अ,ब,क,ड यांना ११ टक्के ,विमाप्र यांना २ टक्के , तर ओबीसी यांना १९ टक्के असे स्वतंत्र आरक्षण असले तरी राजकीय आरक्षण मात्र या तिघांनाही एकत्रित असे दिलेले आहे .व ते ३२ टक्के नसून २७ टक्केच आहे .त्यामुळे या सर्वांनाच एकाच मतदार संघातून निवडणूक लढवावी लागते. त्यांना वेगळे आरक्षण मिळत नाही .
राज्यातील सुमारे ३६ हजार ग्रामपंचायत ,३५०पंचायत समित्या ,नगर परिषद ,नगर पालिका ,३४ जिल्हा परिषदा, व २७ मनपा यात हे आरक्षण होते .
निवडणूक प्रचारापुरते ओबीसी ,धनगर मुद्दा घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१० ते २०१४ या काळात मनमोहन सिंग सरकारने केलेल्या आर्थिक,शैक्षणिक, सामाजिक जनगणनेचे आकडे उघड केले नाहीत.२०१४ ते २०१९ या काळात ओबीसी,भटके विमुक्त,विमाप्र यांची जनगणना केली नाही.त्यामुळेच सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला .
त्वरीत कार्यवाहीसाठी केलेल्या मागण्या :
१.वरील निकालाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील 'नागरिकांच्या मागास प्रवर्गा'चे (ओबीसींचे) आरक्षणच धोक्यात आलेले आहे. 'महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१' मधील सेक्शन १२(२)(क)मध्ये नागरिकांच्या मागासवर्गाच्या आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार के.कृष्णमूर्ती वि.भारत सरकार या खटल्याच्या निकालात नमूद केलेल्या तीन अटींची पूर्तता राज्यशासनाने फार पूर्वीच करणे आवश्यक होते. जेणेकरून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले नसते. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यशासनाने स्वतंत्र व समर्पित आयोग त्वरीत गठीत करून राज्यातील 'नागरिकांच्या मागास प्रवर्गा'च्या (ओबीसींच्या) मागासलेपणाचे स्वरुप, परिणाम आणि लोकसंख्येचे प्रमाण याबाबत समकालिन सखोल आणि अनुभवजन्य माहिती (Empirical Data) गोळा करावी. आणि आयोगाच्या शिफारशींच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार आरक्षणाचे प्रमाण निश्चित करून ते पुनर्स्थापित करावे.
२. ज्या ज्या वेळी ओबीसींच्या सवलतींचा मुद्दा पुढे येतो. त्या त्या वेळी ओबीसींच्या निश्चित लोकसंख्येवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. विधानसभेने एकमताने पारित केलेल्या जातनिहाय जनगणनेबाबतच्या ठरावानुसार केंद्र सरकार जनगणना करीत नसेल तर राज्य शासनाने राज्याची जातनिहाय जनगणना करावी.
३. मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. २७९७/२०१५ प्रकरणी दि. ४ ऑगस्ट, २०१७ रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरविले असले तरी या निर्णयास मा. सर्वोच्च न्यायालयाने अदयाप स्थगिती दिली नसल्याने पदोन्नतीच्या कोटयातील मागासवर्गीयांची ३३ टक्के आरक्षित पदे भरण्यात यावीत. महाराष्ट्र शासनाने दि.७ मे, २०२१ रोजीचा तडकाफडकी काढण्यात आलेला शासन निर्णय हा संविधानविरोधी असल्याने तो पूर्णत: विनाविलंब रद्द करण्यात यावा.
४. "महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती [विमुक्त जाती], भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम २००१" या महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण अधिनियमामध्ये पदोन्नतीमधील आरक्षण देण्याची तरतूद आहे. व त्यानुसार ओबीसींनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे.
त्यामुळेच एकंदरीत सरकारने ओबीसी आयोग नेमून ओबीसी ची त्वरित जातीनिहाय जनगणना करावी व २७ टक्के राजकीय आरक्षण पुन्हा द्यावे ,अन्यथा या गलिच्छ राजकारणवरून येणाऱ्या काळात मोठा वादंग उठून सरकारला तोंडावर पडावे लागेल ,असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले .
यावेळ श्री रामचंद्र ठाकरे विनोदआण्णा खेमणार मनोजभाऊ धनगर भारतभाऊ शिंदे दिपक धनगर विक्की धनगर दिपक चोरमले शिरपुर शहरात यांनी स्वागत केले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा