Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
सुप्रसिद्ध गायक-गीतकार-संगीतकार विष्णू शिंदे यांच्या प्रयत्नाना यश कलावंतांसाठी २८ कोटीच्या कोरोना पॅकेजला मंजुरी
सुप्रसिद्ध गायक-गीतकार-संगीतकार विष्णू शिंदे यांच्या प्रयत्नाना यश कलावंतांसाठी २८ कोटीच्या कोरोना पॅकेजला मंजुरी
लोककलावंत सांस्कृतिक मंच कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्षा,साहित्यिक कवयित्री गायिका अलका ताई घाटे व खान्देशी गोंधळी कलाकार शाहीर परशुराम सुर्यवंशी व इतर कलावंत यांनी मानले माननीय ख्यातनाम गायक गीतकार संगीतकार मा.विष्णू शिंदे व राज्य सरकारांचे आभार
कलावंत बन्धू आणि भगीणीनो गेल्या दीड वर्षा पासून सारा देश कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. कोरोनाची भयंकर लाट सर्वांनाच त्रासदायक ठरली असताना, कोरोना संसर्गवाढीस रोखण्यासाठी राज्य सरकारला लॅाकडाऊनची घोषणा करावी लागली होती त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. जनतेस खूप हाल अपेस्टा सहन कराव्यालागल्या. सरकारने सर्व सांस्कृतिक, धार्मिक उत्सवावर बंदी घातल्याने गावोगावी होणारे यात्रा जत्रा उत्सव.लग्न समारंभ,
जागरण गोंधळ, नामकरण विधी,जन्मदिन सोहळे, किर्तन सप्ताह, सभा सम्मेलने तसेच सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्यात आले नाहीत. पर्यायाने ह्या सर्व मंगल सोहळ्यात गायन-वादन करून आपली गुजराण करणारे तमाम
लोककलावंत हाताला काम नसल्याने हवालदिल झाले. अनेक ज्येष्ठ कलावंत कोरोना काळात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने व गरिब परिस्थिती मुळे मृत्यूमुखी पडले.ह्या भयंकर संकटातून कलावंतांचे परिवार सावरावेत, त्यांना सरकार कडुन आर्थिक मदत मिळावी यासाठी लोककलावंत सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष- विष्णू शिंदे यांचे दीड वर्षापासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते.
कोरोना महामारीच्या कठिण काळात त्यांनी आपल्या ट्रस्ट कडुन मुंबई,नवी मुंबई. ठाणे येथील हजारो कलावंतांना घरपोच रेशनिंग वाटप करुन त्यांना दिलासा दिला होता. कॅंसर ग्रस्त तसेच वयोवृध्द असंख्य कलावंतांच्या बॅंक खात्यात आर्थिक मदत जमा केली होती. कलावंतांना आर्थिक मदत मिळावी म्हणुन संबंधीत मंत्र्यांशीपत्रव्यवहार,गाठीभेटी यांचे सातत्य ठेवले होते.महाराष्ट्र सरकार मधील सांस्कृतिक खाते काँग्रेस पक्षाकडे असल्या मुळे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननिय अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात शेकडो कलावंतांच्या उपस्थितीत बैठकांचे आयोजन करून कलावंतांच्या दुःखांची-अडीअडचणीची त्यांना जाणीव करून दिली.
ह्या प्रयत्ना नंतर कलावंता संदर्भात कार्यवाहीची चक्रे वेगाने फिरली आणि महाराष्ट्र राज्याचे कृतीशील मुख्यमंत्री मा.ना.उध्दव ठाकरे साहेब,राज्याचे
सांस्कृतिक कार्य मंत्री मा.ना. अमित देशमुख साहेब यांनी कलावंतांसाठी २८ कोटीचे मदतीचे पॅकेज जाहीर करुन ५६ हजार कलावंतांना सरसकट ५ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.राज्य सरकारने घेतलेल्या ह्या दिलासादायक निर्णया बध्दल महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांच्या वतीने राज्य सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा