Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

पटेल परिवाराच्या प्रयत्नाने शिरपूर येथील शरदचंद्र नगर मधील घरकुल धारकांना दिलासा, घर मालकांच्या नावावर घरे होण्यास सुरुवात



शिरपूर प्रतिनिधी : पटेल परिवाराच्या प्रयत्नाने शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या शरदचंद्र नगर मधील घरकुल धारकांना दिलासा मिळाला असून सर्व २४० घरमालकांना त्यांच्या नावावर घरे होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने व त्यांच्या मार्गदर्शनानुसार शिरपूर वरवाडे नगर परिषद मार्फत २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अल्प उत्पन्न गट योजना अंतर्गत शरदचंद्र नगर येथील २४० घरमालकांना त्यांची घरे त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२५ वर्षांपूर्वी शिरपूर वरवाडे नगर परिषदे मार्फत महाराष्ट्र शासनाच्या हडको योजना अंतर्गत शरदचंद्र नगर या घरकुलाची निर्मिती केली. शरदचंद्र नगर मध्ये नर्मदा, पांझरा, तापी, अरुणावती, कृष्णा, भीमा, अनेर, गंगा, कावेरी, गोदावरी या दहा इमारतींचे आरसीसी स्वरूपाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. एका इमारतीत २४ घरकुल असून संपूर्ण शरदचंद्र नगर मध्ये २४० घरकुल धारक वास्तव्य करतात. सर्व घरकुल धारकांचे कर्जाचे सर्व खाते पूर्णपणे भरण्यात आले आहेत. 

त्यामुळे सदर घरकुल धारकांचे नावाने त्यांची घरे करणे कामी, या सर्व घरकुल धारकांना घरकुलाचा उपभोग मालकी हक्काने घेता यावा, घरावर कर्ज घेता यावे, घरकुलाचा महसुली उतारा असावा याबाबतीत माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी अनमोल सहकार्य केले तसेच त्यांच्या प्रयत्नाने या सर्व २४० घरकुल धारकांची घरे मालकी हक्काने करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

या कामाची सुरुवात शरदचंद्र नगर मधील तापी व पांझरा या इमारतीतील रहिवासी अशोक देवरे व दिलीप पाटील या घरकुल धारकांचे घरकुल त्यांच्या त्यांच्या नावाने खरेदी खत द्वारे नोंदणी पद्धतीने उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते प्रभारी नोंदणी अधिकारी गोरखनाथ सैंदाणे यांच्याकडे सुपूर्द करून नुकतेच करण्यात आले. यावेळी नोंदणी कार्यालयात उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसेवक चंद्रकांत कोळी, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, नगर अभियंता माधवराव पाटील, घनश्याम कुलकर्णी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी सचिन वाघ, नोंदणी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शाहरुख पिंजारी उपस्थित होते.

या सर्व दस्ताचे लिखाण शिरपूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. सुरेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील स्टॅम्प वेंडर घनश्याम कुळकर्णी यांनी पूर्ण केले आहे. या इमारतीचे सर्व महसूली कागदपत्रे अद्यावत करण्याचे संपूर्ण कार्यवाही शिरपूर मंडळाधिकारी प्रशांत ढोले, तलाठी अमृतसिंग राजपूत यांच्या मार्फत करण्यात आले. शरदचंद्र नगर मधील सर्व २४० घरकुल धारकांनी आपल्या नावावर घरे करण्या संदर्भात पूर्तता करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध